शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दाटीवाटीमुळे नागरी सुविधा देण्यात अडचणी

By admin | Updated: July 30, 2015 23:25 IST

कल्याण (पूर्व), प्र.क्र. ४७, श्रीराम कॉलनी प्रभागात अंदाजे लोकसंख्या ११ हजार असून अमराठी भाषिकांचा टक्का मोठा आहे. साईबाबा कॉलनी, औवधारामनगर, भानुशालीनगर, पंचशील कॉलनी,

- दिवाकर गोळपकर,  कोळसेवाडीकल्याण (पूर्व), प्र.क्र. ४७, श्रीराम कॉलनी प्रभागात अंदाजे लोकसंख्या ११ हजार असून अमराठी भाषिकांचा टक्का मोठा आहे. साईबाबा कॉलनी, औवधारामनगर, भानुशालीनगर, पंचशील कॉलनी, साकेत कॉलनी, महेश कॉलनी इ. वसाहतींमध्ये उत्तर प्रदेश, बिहारी, महाराष्ट्रीयन, गुजराती, दक्षिण भारतीय वगैरे ९५ टक्के चाळी व ५ टक्के इमारतींमध्ये सामावले आहेत. दाटीवाटीच्या लोकवस्तीमुळे नागरी सुविधा पुरविण्यात अनेक अडचणी येतात.या प्रभागात गटारे, पायवाटांव्यतिरिक्त विशेष सुविधा नाही. कारण, सर्व्हे नं. २९ उद्यानाचे आरक्षण होते. परंतु, आरक्षणापैकी ९० टक्के भाग आशेळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेला आहे व १० टक्के आरक्षित जमीन मनपामध्ये आहे. पण, तेथे चाळी झालेल्या आहेत. प्रथमेशनगर सर्व्हे नं. ५८ मध्ये ३५०० चौ.मी. मोकळी जागा आहे. परंतु, मनपाकडे हस्तांतरित नसल्यामुळे व प्राथमिक शाळेचे आरक्षण असूनही खाजगी जागेमुळे विकास करता येत नाही.या प्रभागात पूर्वी दिवसाआड टॅँकरने पाणीपुरवठा होत असे. सर्वत्र पाणीटंचाई होती. परंतु, पाणीपुरवठ्याला प्राधान्य देऊन मोहीम राबविल्यामुळे प्रथमेशनगर, अर्जुननगर, बाळकृष्ण कॉलनी, मातोश्रीनगर आदी सर्व वसाहतींमध्ये सुरळीत पाणीपुरवठा होत असल्याचे नगरसेवक विक्रम तरे यांनी सांगितले आहे.पंचशील कॉलनी, ओंकार बिल्डिंग, मातोश्रीनगर, साईबाबा कॉलनी, अमोलनगर इ. बहुसंख्य वासाहतींमध्ये नव्याने गटारे बांधली व काही ठिकाणी दुरुस्त केली. परंतु, रहिवाशांच्या मते तुंबलेली गटारे वेळेवर साफ होत नाही. या प्रभागात नव्याने डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. प्रमुख रस्त्यांखाली मलवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. परंतु, वसाहतींतर्गत व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे मैला गटारे व नाल्यांतून वाहत असतो. रामनगरमध्ये तळ अधिक दोन मजली सुलभ शौचालय असून ते वापर नसल्यामुळे बंद आहे. कचराकुंड्या दोन आहेत. प्रथमेशनगर व गावदेवी प्रवेशद्वार येथे घंटागाड्यांच्या वेळेत नागरिक त्यांचा लाभ घेतात. परंतु, बहुतांश कचरा गटारे, नाल्यांमध्ये टाकला जातो. औवधारामनगरचा रस्ता अर्धवट पूर्ण झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.