शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बिबळ्यांनी घेतली वस्तीकडे धाव

By admin | Updated: January 4, 2016 01:29 IST

गेल्या पंधरवड्यात या जिल्ह्यातील अनेक गावे आणि पाडे यातील पाळीव पशूंना आपले भक्ष्य बिबळ्याचे बनविण्याचे प्रकार वाढले आहेत.

पालघर : गेल्या पंधरवड्यात या जिल्ह्यातील अनेक गावे आणि पाडे यातील पाळीव पशूंना आपले भक्ष्य बिबळ्याचे बनविण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामागे लगतच्या जिल्ह्यातील ऊसाची झालेली तोड, बिबळ्यांची वाढती संख्या आणि जंगलात जाणवणारा भक्षांचा अभाव व त्यांचा वीणीचा काळ ही कारणे असल्याचे वनखात्यांच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.हिवाळा हा बिबळ्यांच्या प्रजननाचा काळ आहे. पावसाळ्यात बिबळ्यांच्या नर-मादीचे मिलन होते व हिवाळ्यात मादी पिल्लांना जन्म देते त्यासाठी त्यांना लागणारा एकांत हे नर, मादी बिबळे ठाणे, नाशिक, नगर, पुणे या जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या ऊसाच्या फडामध्ये मिळवीत असतात. दिवसभर फडामध्ये अगदी आतल्या बाजूस राहायचे आणि रात्री अथवा पहाटे लगतच्या शेतावरील प्राणी फस्त करायचे अशी त्यांची पद्धती असते. परंतु ऊसाचा गळीत हंगाम सुरू झाला की, ऊसाची तोड सुरू होते आणि या बिबळ्यांना पिलासह जवळपासच्या जंगलाचा अथवा मिळेल त्या रानावनाचा आश्रय घ्यावा लागतो. मादी प्रसूत झाल्यामुळे अशक्त झालेली असते. त्यामुळे ती जंगलात शिकार करण्याऐवजी जवळपासच्या मानवी वस्तीत असलेल्या पाळीव प्राण्यांना भक्ष्य करणे पसंत करते. कारण ते बांधून ठेवले असल्यामुळे तिच्या तावडीत सहज सापडतात. या कारणाबरोबरच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तानसा अभयारण्य यातील बिबळ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यांना आवश्यक त्या प्रमाणात तिथे भक्ष्य उपलब्ध नसल्यामुळे ते मानवी वस्तीकडे सध्या धाव घेताहेत. दुसरीकडे रानडुक्करांची संख्या प्रचंड वाढली आहे. ते याच परिसरातल्या गाव-पाड्यातील शेतीला, पिकांना फस्त करण्यासाठी येत असतात. जव्हार तालुक्यात अशा डुकरांच्या हल्ल्यात गेल्याच महिन्यात तीन शेतकरी जखमी झाले होते. या डुकरांची शिकार करण्यासाठी बिबळे गाव-पाड्यानजीक येतात आणि डुकरे मिळाली नाही तर तेथील पाळीव प्राणी उचलून नेतात. यामध्ये वनखात्याच्या हाती पिंजरा लावणे एवढाच उपाय असतो. परंतु तो सुद्धा कुठेही लावता येत नाही. बिबळ्या हा शेड्युल ए मधला प्राणी असल्याने त्याबाबत कोणतीही कारवाई करताना वनखात्याला असंख्य नियमांचे पालन करावे लागते. बिबळ्याने जनावरे उचलून नेली अथवा त्यांना भक्ष्य केले की गावकरी पिंजरा लावा अशी मागणी करतात. परंतु जोपर्यंत बिबळ्या हा नरभक्षक होत नाही किंबहुना त्याचा उच्छाद निर्माण होत नाही तोपर्यंत पिंजरा लावता येत नाही. तो लावण्याची प्रक्रिया देखील मोठी असते. हे देखील गावकऱ्यांनी लक्षात घ्यावे. बिबळ्या हा श्वांपद आहे. शिकार करणे हा त्याचा स्वभाव आणि पोट भरण्याचा भाग आहे. त्यामुळे केवळ त्याने एखाद्या वस्तीतून प्राणी उचलून नेले अथवा मारून खाल्ले या कारणासाठी त्याला पकडण्याकरीता पिंजरा लावता येत नाही. हे समजून घ्यावे, असे या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.> कुत्रा, शेळ्या, मेंढया, करडू, गाई, म्हशी हे प्राणी उघड्या गोठ्यात बांधून ठेऊ नका.शक्यतो रात्री लाईट सुरू ठेवा, घराच्या किंवा मळ्यातील घराच्या आसपास शेकोटी पेटवून ठेवा. ते शक्य नसेल तर मशाल, टेंभा, पलिते पेटते ठेवा.घराचे दरवाजे मजबूत ठेवा, खिडक्यांना जाळ्या लावा.