शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कसारा घाटातील अपघात म्हणे किरकोळ, रेल्वेला गांभीर्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 05:16 IST

कसारा घाटात गुरुवारी पहाटे अंत्योदय एक्स्प्रेसचा एक डबा भीमा दोन या ब्रिटिशकालीन पुलावर घसरला.

कसारा : कसारा घाटात गुरुवारी पहाटे अंत्योदय एक्स्प्रेसचा एक डबा भीमा दोन या ब्रिटिशकालीन पुलावर घसरला. सुदैवाने जास्त डबे रुळांवरून खाली उतरले नाहीत, अन्यथा, डबे ५०० फूट खोल दरीत कोसळून आपघात झाला असता. परंतु, या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने किरकोळ अपघात असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात हजारो प्रवासी मृत्यूच्या छायेत होते.या दुर्घटनेत अपघातस्थळापासून एक किलोमीटर अंतरावरील रेल्वेमार्गाच्या खालचे स्लीपर, लोखंडी चाव्या, नटबोल्ट पूर्णपणे उखडले गेले असून काही लोखंडी खांबही वाकले आहेत. पुलावर रेल्वेमार्गाच्या फिटिंगसाठी वापरलेल्या नटबोल्टचे तुकडे झाले आहेत. दुर्घटनाग्रस्त गाडीचा डबा रुळांवर आणण्यासाठी तब्बल २०० रेल्वे कर्मचारी व डझनभर अधिकारी कार्यरत होते.एवढे असतानाही अजूनपर्यंत मध्य रेल्वे प्रशासनाने हा अपघात गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. अजूनपर्यंत एकही तज्ज्ञ अधिकारी तेथे चौकशीसाठी आलेला नाही. रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांपासून उच्च अधिकारी असलेल्या रेल्वे व्यवस्थापक यांना अपघाताचे कारण घटनेला २४ तास उलटूनही समजू शकलेले नाही. परंतु, ही दुर्घटना अभियांत्रिकी चुकांमुळे झाल्याचे बोलले जात आहे.>मदतीला उशीरप्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वे प्रशासनाअगोदर आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य व शहापूरचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर घटनास्थळी दाखल झाले. अपघाताच्या ठिकाणापासून इगतपुरी १५ मिनिटांच्या अंतरावर असताना, एकही रेल्वे, महसूल, पोलीस प्रशासनाचा अधिकारी व कर्मचारी सकाळी ६ पर्यंत घटनास्थळी आला नव्हता.