शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकासासाठी जातीने लक्ष घालीन

By admin | Updated: April 22, 2016 01:53 IST

ग्रामविकासाकरिता ग्रामपंचायतस्तरावरून पाठवलेले जे प्रस्ताव प्रलंबित आहेत, ते निकाली काढण्यासाठी स्वत: पुढाकार घेईन, अशी ग्वाही केंद्रीय ग्रामविकास विभागाचे उपसचिव के. संजयन यांनी दिली

लोनाड : ग्रामविकासाकरिता ग्रामपंचायतस्तरावरून पाठवलेले जे प्रस्ताव प्रलंबित आहेत, ते निकाली काढण्यासाठी स्वत: पुढाकार घेईन, अशी ग्वाही केंद्रीय ग्रामविकास विभागाचे उपसचिव के. संजयन यांनी दिली. विकासासाठी नागरिकांनी दाखवलेली एकवाक्यता वाखाण्याजोगी असल्याचे ते म्हणाले. भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी आदर्श संसद ग्रामयोजनेसाठी निवडलेल्या सोनाळे ग्रामपंचायतीत ‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियानांतर्गत केंद्रीय ग्रामविकास विभागाचे उपसचिव के. संजयन यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी ग्रामसभा झाली. ग्रामविकासाकरिता ग्रामस्थांनी मतभेद बाजूला ठेवावे, असे आवाहन खासदार पाटील यांनी केले. सोनाळे ग्रामपंचायतीचे नाव दिल्लीपर्यंत गेले पाहिजे. आपला आदर्श इतरांना घेता येईल. त्यासाठी मी तुमच्यासोबत आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. आपण सगळ्यांनी मिळून एकजुटीने हा गाव पुढे नेऊ, असेही ते म्हणाले. ग्रामपंचायतीला विकासकामांच्या निधीसाठी एक कोटीची आवश्यकता असल्याचे ग्रामसेवक के.बी. माळी यांनी सांगितले. तेव्हा पाटील यांनी तीन कोटींचा निधी मिळवून देण्याचे आश्वासन ग्रामसभेला दिले. या वेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, उपजिल्हाधिकारी अर्चना कदम, भिवंडीच्या गटविकास अधिकारी करु णा जुईकर, सहायक गटविकास अधिकारी हनुमंत दोडके, सरपंच जनार्र्दन वाकडे, उपसरपंच विनिता थळे, ग्रामसेवक के.बी. माळी, ग्रामपंचायत सदस्य विसुभाऊ म्हात्रे उपस्थित होते. (वार्ताहर)