शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेविकेचे जातप्रमाणपत्र रद्द

By admin | Updated: December 22, 2016 05:49 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग क्र.-४अ च्या भाजपा नगरसेविका सरस्वती रजनीकांत मयेकर यांचे जातप्रमाणपत्र खोटे

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग क्र.-४अ च्या भाजपा नगरसेविका सरस्वती रजनीकांत मयेकर यांचे जातप्रमाणपत्र खोटे असल्याचा निर्णय जातपडताळणी समितीच्या फेरतपासणीत उघड झाल्याने उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे शाबूत राहिलेले नगरसेवकपद पुन्हा धोक्यात आले आहे. आॅगस्ट २०१२ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर माजी नगरसेवक रजनीकांत मयेकर यांची पत्नी सरस्वती निवडून आल्या होत्या. महिलांच्या इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघातून निवडून आलेल्या मयेकर यांनी इतर मागासवर्गातील ‘मच्छीमार दालदी’ या जातीचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी कोकण विभागीय जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केले होते. त्यावेळी समितीने मयेकर यांचे जातप्रमाणपत्र वैध ठरवत त्यांना १२ जुलै २०१२ रोजी वैधता प्रमाणपत्र दिले. जातपडताळणीवेळी मयेकर यांनी वडिलांच्या शाळेचा दाखला सादर केला होता. त्यात त्यांची जात मुसलमान सुुन्नी अशी नमूद केली असतानाही समितीने त्यांना जातवैधता प्रमाणपत्र दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते. मयेकर या मुस्लिम समाजाच्या असून लग्नापूर्वी त्यांचे नाव फरजाना अलिमिया शेगले, असे होते. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मच्छीमार दालदी या जातीनुसार मयेकर यांनी आपल्या वडिलांचा मासेमारीचा व्यवसाय नमूद केला होता. समितीच्या निर्णयाविरोधात पराभूत उमेदवार व राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका नर्मदा वैती यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्यावर, न्यायालयाने १४ मार्च २०१३ रोजी निर्णय देत सदर चौकशी कोकण विभागीय जातप्रमाणपत्र समितीपुढे सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, झालेल्या चौकशीत समितीला जातपडताळणीवेळी मयेकर यांनी १९६७ पूर्वी सादर केलेल्या वडिलांच्या शाळेच्या दाखल्यात त्यांची जात मुसलमान सुन्नी नमूद केल्याचे आढळून आले. तेव्हा मयेकर यांनी उमेदवारी अर्ज सादर करतेवेळी उल्लेख केलेली मच्छीमार दालदी ही इतर मागासवर्गीय प्रवर्गातील जातीचा दावा खोटा असल्याचा निर्वाळा समितीने दिला. शिवाय, मयेकर यांचे वडील एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. त्यामुळे त्यांनी वडिलांचा दाखवलेला मासेमारीचा व्यवसायही फोल ठरल्याने मयेकर यांना आपल्या जातीचा कोणताही पुरावा चौकशी समितीपुढे मांडता आला नाही. यावरून, समितीने ३० जुलै २०१३ रोजी दिलेल्या आदेशात सरस्वती मयेकर या इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मच्छीमार दालदी या जातीच्या नसून त्यांनी जातीचा दिलेलादाखला खोटा असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार, त्यांचे जातप्रमाणपत्र रद्द करून ते जप्त करण्यात येत असल्याचेही आदेशात म्हटले होते. समितीच्या निर्णयानुसार पालिकेने आॅगस्ट २०१३ मध्ये मयेकर यांचे नगरसेवकपद रद्द केल्याची नोटीस बजावली. (प्रतिनिधी)