शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कांदळवन क्षेत्रात भराव व बांधकामे करणाऱ्यांवर दोन वर्षांनी गुन्हे दाखल

By धीरज परब | Updated: April 19, 2025 14:16 IST

मुंबई उच्च न्यायालयाने २००५ साली आणि नंतर २०१८ साली कांदळवन व कांदळवनपासून ५० मीटरचा बफर झोन हा संरक्षित केला आहे.

मीरारोड- भाईंदर व मीरारोडच्या घोडबंदर भागात कांदळवन क्षेत्रात भराव व बांधकाम प्रकरणी महसूल विभागाने नवघर आणि काशीगाव पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे घोडबंदर प्रकरणी दोन वर्षांनी गुन्हा दाखल होत असून एका जागेत तर पालिकेच्या परवानगीने इमारत बांधकाम परवानगी दिली असताना पालिका अधिकारी यांना आरोपी केलेले नाही.  

मुंबई उच्च न्यायालयाने २००५ साली आणि नंतर २०१८ साली कांदळवन व कांदळवन पासून ५० मीटरचा बफर झोन हा संरक्षित केला आहे. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचा भराव, बांधकाम बंदी आहे. ह्या क्षेत्रात कोणतेही वनेत्तर काम व वापर करण्यास बंदी आहे. भराव, बांधकाम झाले असल्यास ते काढून पूर्वस्थिती निर्माण करणे नुसार कांदळवन लागवड व भरतीचे पाण्याचा मार्ग मोकळा करणे आवश्यक आहे. त्याचे पालन करण्याची जबाबदारी महापालिका, पोलीस, महसूल, वन विभागासह लोकप्रतिनिधी, राजकारणी यांची पण आहे. 

सदर यंत्रणांच्या आशीर्वादाने राजरोस कांदळवन कत्तल करून त्यात भराव करून भूखंड तयार केले गेले आहेत. त्यात कच्ची - पक्की बांधकामे झालेली आहेत. इतकेच नव्हे तर महापालिकेने गुन्हे दाखल असलेल्या तसेच कांदळवन क्षेत्रात बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. त्याला वीज, पाणी आदी सर्व सुविधा दिल्या जात आहेत. 

दरम्यान तक्रारी आल्या नंतर देखील तातडीने कारवाई होत नाही. अश्याच दोन प्रकरणात महसूल विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. मौजे घोडबंदर येथील सर्व्हे क्रं. १ / १ ते ७, सर्व्हे क्रं. ३ /१ ते ७, सर्व्हे क्रं. ५ / १ ते ५, सर्व्हे क्रं. ५५ / १ ते ४, सर्व्हे क्रं. ७ / १ ते ७, सर्व्हे क्रं. २३२ / १ व २ आणि सर्व्हे क्रं. ४३ / १ ते ६ ज्या जागेतील कांदळवन क्षेत्रात कांदळवन नष्ट करून डेब्रिज व मातीची भरणी टाकून भरतीच्या पाण्याचे मार्ग बंद केले गेले. त्यावर झोपड्या, गोदामे सह अन्य बांधकामे झाली.  तक्रारी नंतर उपसमितीची मार्च २०२३ व जुलै २०२३ मध्ये ऐकून ३ वेळा स्थळपाहणी केली गेली होती. 

जुलै २०२३ व जानेवारी २०२४ मध्ये कांदळवन वन परिक्षेत्र अधिकारी यांनी त्यांचा २००५ नुसारचा एमआरसॅक नकाशाचा हवाला देऊन अहवाल दिला होता. त्याचा गुन्हा दोन वर्षांनी म्हणजेच १५ एप्रिल रोजी काशिगाव पोलीस ठाण्यात तलाठी ललित सातपुते यांनी दाखल केला आहे. सदर गुन्ह्यात केवळ अनोळखी नमूद केले असून सातबारा नोंदी नावे असलेल्या, भराव व सपाटीकरण करणारे वाहन चालक - मालक, जागेवरील भोगवटादार आदींना आरोपी न करता केवळ अनोळखी आरोपी नमूद केला आहे. 

मिरारोड पूर्वेच्या कनकिया परिसरात कांदळवन क्षेत्र बाबतच्या तक्रारीनंतर १८ एप्रिल २०२४ रोजी स्थळपाहणी झाली होती. कांदळवन वन परिक्षेत्र अधिकारी यांनी डिसेम्बर २०२४ मध्ये अहवाल देत मौजे नवघर येथील सर्व्हे क्रं. ८४ हिस्सा क्रं. ४ ह्या कांदळवन ५० मीटर बफर झोन मध्ये पालिकेने बांधकाम परवानगी दिली. बांधकाम परवानगी नुसार खोदकाम करून इमारतीचे बांधकाम सुरु केले गेले. या प्रकरणी  तलाठी तुषार खेडकर यांच्या फिर्यादी वरून वालचंद अव्हेन्यू इमारतीचे विकासक हरीश प्रकाश जैन विरोधात पर्यावरण संरक्षण कायदा नुसार मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  परंतु बांधकाम परवानगी देणाऱ्या महापालिका अधिकारी यांना आरोपी केलेले नाही. 

टॅग्स :mira roadमीरा रोड