शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आरएसएसच्या अवमान याचिका प्रकरणी राहूल गांधी १२ जून रोजी भिवंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 22:34 IST

भिवंडी : लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यान काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत आरएसएसवर केलेल्या आरोपा प्रकरणी भिवंडी कोर्टात मानहानीची याचिका दाखल आहे. या याचिकेची आज दुपारी रोजी सुनावणी झाली.मागील सुनावणीच्या वेळी राहुल गांधी यांच्या स्थानिक वकीलांनी मागणी केल्यानुसार दोषारोप मांडण्यासाठी कोर्टाने १२ जून रोजी ...

ठळक मुद्देराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत आरएसएस वरील आरोप प्रकरणी भिवंडी कोर्टात मानहानीची याचिकासमरी ट्रायल प्रक्रिये ऐवजी याचिका समन्स ट्रायल प्रक्रि येद्वारे चालविण्याची मागणी पुढील सुनावणी१२ जून रोजी

भिवंडी : लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यान काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत आरएसएसवर केलेल्या आरोपा प्रकरणी भिवंडी कोर्टात मानहानीची याचिका दाखल आहे. या याचिकेची आज दुपारी रोजी सुनावणी झाली.मागील सुनावणीच्या वेळी राहुल गांधी यांच्या स्थानिक वकीलांनी मागणी केल्यानुसार दोषारोप मांडण्यासाठी कोर्टाने १२ जून रोजी दोन्ही पक्षाच्या वकीलांसह राहूल गांधी यांना हजर रहाण्यास सांगीतले आहे.तालुक्यात सोनाळे गावातील मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या लोकसभा निवडणूक प्रचारसभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्ये प्रकरणी आरएसएस संघटनेवर आरोप केला.त्यामुळे आरएसएसचे जिल्हा कार्यवाह राजेश कुंटे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी कोर्टात मानहानी याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी आज भिवंडी कोर्टात झाली.भिवंडी कोर्टात मागील सुनावणीच्या वेळी राहूल गांधी गैरहजर असताना त्यांच्या वकीलांनी ही केस ऐतिहासीक असल्याने कोर्टापुढे सबळ पुरावा यावा आणि वस्तुस्थिती समोर यावी या साठी समरी ट्रायल प्रक्रियेव्दारा न चालविता ती समन्स ट्रायल प्रक्रि येद्वारे चालवावी,अशी मागणी केली होती.त्यानुसार कोर्टासमोर विविध पुस्तके,कोर्टाचे निकाल,पुरावे व साक्षीदार तपासण्यात येणार आहेत. त्यासाठी दोषारोप मांडणीसाठी राहुल गांधी याच्यासह दोन्ही बाजूच्या पक्षकारांचे वकीलांनी हजर रहावे,असे न्यायाधिश ए.ए.शेख यांनी कोर्टात सांगीतले. यावेळी राहुल गांधी यांची बाजू अँड.कुशाल मोर व अँड.नारायण अय्यर यांनी मांडली.तर याचिकाकर्त्याची बाजू अँड.नंदू फडके यांनी मांडली.या याचिकेबाबत दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये उत्कंठा वाढीस लागली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीRahul Gandhiराहुल गांधी