शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नवाढ झाल्यास सुविधा देणे शक्य

By admin | Updated: February 11, 2017 03:49 IST

एका बाजूला उत्पन्नात वाढ होत नसताना दुसरीकडे सुविधांसाठी खर्च होत आहे. त्यामुळे तूट वाढत आहे. ही भरून न निघाल्यास भविष्यात नागरी सुविधा देणे अशक्य होईल

भार्इंदर : एका बाजूला उत्पन्नात वाढ होत नसताना दुसरीकडे सुविधांसाठी खर्च होत आहे. त्यामुळे तूट वाढत आहे. ही भरून न निघाल्यास भविष्यात नागरी सुविधा देणे अशक्य होईल, अशी सूचना प्रशासनाने अंदाजपत्रकात व्यक्त केली आहे. उत्पन्नात वाढ करण्यासाठी कर, पाणीपट्टीवाढ तसेच पालिकेच्या जागा भाड्याने देणे गरजेचे आहे, असे मतही नोंदवले आहे. मीरा-भार्इंदर पालिकेने गेल्यावर्षीच्या १ हजार ३८९ कोटींच्या अंदाजपत्रकात यंदा ५३ कोटींची वाढ करून एकूण १ हजार ४४२ कोटी ८९ लाख २८ रुपयांचे अंदाजपत्रक उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी शुक्रवारी स्थायी सभापती प्रभाकर म्हात्रे यांना सादर केले. मुख्य लेखापरीक्षक एम.एम. निपाणे, मुख्यलेखाधिकारी शरद बेलवटे, सहायक लेखाधिकारी सुरेश घोलप, माजी स्थायी सभापती शरद पाटील, हरिश्चंद्र आमगावकर, सदस्य प्रेमनाथ पाटील उपस्थित होते. यंदाचे अंदाजपत्रक १५ लाख ६० हजार शिलकीचे असून त्यात कोणतीही करवाढ व नवीन प्रकल्प तसेच योजनांचा समावेश नाही. महासभेपुढे १९ फेब्रुवारीपूर्वी अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. सरकारी अनुदानाखेरीज एकूण ४५८ कोटी ३२ लाखांचे मूळ उत्पन्न असलेल्या या अंदाजपत्रकात एमएमआरडीए व इतर संस्थांमार्फत घेण्यात आलेले एकूण २३३ कोटी कर्ज दाखवण्यात आले आहे. या आर्थिक वर्षात त्यात १२९ कोटींची वाढ होणार आहे. (प्रतिनिधी)