शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:41 IST

मीरा रोड : गृहनिर्माण संस्थेवर नेमलेला प्रशासक बदला, या मागणीकरिता भाईंदर येथील उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात जाऊन धुडगूस घालत ...

मीरा रोड : गृहनिर्माण संस्थेवर नेमलेला प्रशासक बदला, या मागणीकरिता भाईंदर येथील उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात जाऊन धुडगूस घालत धमक्या देणाऱ्या एका दाम्पत्याविरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

भाईंदर पश्चिमेला असलेल्या उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात मीरा रोडच्या जांगीड कॉम्प्लेक्समधील गंगोत्री गृहनिर्माण संस्थेतील भावना मंडोरा व त्यांचे पती राजेश मंडोरा सायंकाळी ५ वा.च्या सुमारास गेले. कार्यालयातील उपनिबंधक सतीश देवकते यांच्या दालनात हे दाम्पत्य शिरले. आमच्या सोसायटीचे प्राधिकृत प्रशासक अधिकारी श्रद्धा संदीप कदम यांच्याऐवजी अलिहैदर शेख यांची नियुक्ती का केली, अशी विचारणा करून देवकते यांच्याशी वाद घालणे सुरू केले. आरडाओरडा करून भावना व राजेश यांनी जोपर्यंत तुम्ही शेख यांच्या नियुक्तीचा आदेश रद्द करत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही, असे धमकावत देवकते यांना कार्यालयाबाहेर जाण्यापासून अडवले व कार्यालयातील कामात अडथळा आणला. तसेच कार्यालयातील कागदपत्रे जाळून टाकण्याची धमकी दिली. भावना व राजेश मंडोरा यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

.......

वाचली