शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांना मिळणार ‘गाजर’ हलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:59 IST

युतीच्या दाट चिन्हांनी निराशा : मतदारसंघबांधणीकरिता केलेली खैरात जाणार वाया

ठाणे : मराठा आरक्षणापाठोपाठ विधानसभा उपाध्यक्षपद आणि विधान परिषद उपसभापतीपदाकरिता भाजपाने शिवसेनेला संधी दिल्याने या दोन्ही पक्षांनी युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. परिणामी, आगामी विधानसभा निवडणुकीत ठाण्यातून शिवसेना आणि भाजपामधून लढण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या डझनभर इच्छुकांचा स्वप्नभंग होणार आहे. त्यामुळे आतापासूनच युती होऊ नये, म्हणून काहींनी देव पाण्यात घातले आहेत.

काही महिन्यांपूर्वी स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेने आता अपेक्षेप्रमाणे त्या घोषणेपासून घूमजाव करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत युतीच दोन्ही पक्षांना तारेल, याची जाणीव भाजपा-शिवसेनेला झाल्याने या दोघांमधील तणाव आता हळूहळू का होईना कमी होऊ लागला आहे. येत्या काही महिन्यांत लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागतील. त्यापाठोपाठ आॅक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे. राम मंदिरावरून शिवसेनेने भाजपाला आव्हान दिले असले, तरी दोन्ही पक्षांची या विषयावरील भावना व मागणी एकच आहे. शिवसेनेला जातीवर आधारित आरक्षण आतापर्यंत मान्य नसतानाही मराठा आरक्षण लागू करण्यातही उभयतांमध्ये एकवाक्यता दिसली आहे. गेली चार वर्षे रिक्त ठेवलेले विधानसभा उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्यात आले आहे, तर विधान परिषदेच्या उपसभापतीपदावरील शिवसेनेची दावेदारी मान्य करण्यास भाजपा तयार आहे. त्यामुळे युतीमध्ये असलेला तणाव झपाट्याने कमी होण्यास हे वातावरण पोषक मानले जात आहे. त्यामुळे राज्याच्या अन्य भागांप्रमाणेच ठाण्यातील दोन्ही पक्षांमधील संभाव्य उमदेवारांचे टेन्शन मात्र वाढले आहे.

यूती होणार नसल्याची गृहीत धरुन मागील दीड वर्षापासून दोन्ही पक्षातील इच्छुक आपापल्या संभाव्य मतदारसंघात कामाला लागले होते. काहींनी प्रचाराची सुरुवात केली आहे. ठाणे शहर मतदारसंघ भाजपाकडे आहे. येथून लढण्याकरिता शिवसेनेतील नरेश म्हस्के, देवराम भोईर, संजय भोईर, अनंत तरे, केदार दिघे यांच्यासह भाजपामधून डॉ. राजेश मढवी यांनीही तयारी सुरू केली आहे. या सर्वांनी दीड वर्षापासून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला.

कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांना टक्कर देण्यासाठी भाजपाचे अ‍ॅड. संदीप लेले, भरत चव्हाण यांनी तयारी केली. ओवळा-माजिवडा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांना शह देण्यासाठी भाजपाचे मनोहर डुंबरे आणि शिवाजी पाटील यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एकही संधी सोडलेली नाही. पाटील यांनी ठाण्यातील सर्वात मोठी दहीहंडी उभारून त्याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाचारण केले.युती झाली तर ठाणे शहर मतदारसंघ पुन्हा भाजपाच्या वाट्याला जाणार असून कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजिवडा मतदारसंघ शिवसेनेकडे राहणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघांसाठी फिल्डिंग लावून बसलेल्या अनेक उमेदवारांच्या महत्त्वाकांक्षा धुळीस मिळणार आहेत.

या मतदारसंघांमधील इच्छुक उमेदवारांनी दीड मोठा खर्च केला. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात प्रत्येक मंडळांना देणग्या दिल्या. कुणाच्या खिशाला किती खार लागला, याची खुसखुशीत चर्चा ठाण्यात सुरू झाली आहे. काहीतरी चमत्कार घडेल व युती होणार नाही, या अंधुक आशेवर इच्छुकांची भिस्त आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर ठाण्यातील अनेक इच्छुकांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली होती. यूती नाही झाली तर एरव्ही दोन्ही पक्षांमध्ये होणारे मतदारसंघांचे वाटप टळेल आणि आपल्याला नक्की संधी मिळेल, या आशेवर इच्छुक उमेदवारांनी तयारीही सुरु केली.

टॅग्स :thaneठाणे