शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलवर अ‍ॅप्स डाऊनलोड करताना योग्य ती काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:49 IST

आपले संगणक सुरक्षित राखणे हे डिजिटल युगासाठी महत्वाचे असून व्हायरसचा धोका टाळण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करणे गरजेचे आहे.

ठाणे : आपले संगणक सुरक्षित राखणे हे डिजिटल युगासाठी महत्वाचे असून व्हायरसचा धोका टाळण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट करणे गरजेचे आहे. मोबाइलवर अ‍ॅप्स डाऊनलोड करताना योग्य ती काळजी घ्यावी, गरजेचे व अधिकृतच अ‍ॅपच डाऊनलोड करावेत, असा सल्ला ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. आल्हाद आपटे यांनी दिला.जिज्ञासा ट्रस्ट ठाणे व लोकजागर, ठाणे आयोजित सी.डी. देशमुख - दिलीप महाजन स्मृती व्याख्यान अंतर्गत ‘डिजिटल जग व सायबर सुरक्षा’ या याविषयावर ते मंगळवारी मराठी ग्रंथ संग्रहालयात बोलत होते. ते म्हणाले की, ज्या मोबाइलवरुन पैशांचे व्यवहार केले जातात त्या मोबाइलवर गेम्स किंवा इतर अ‍ॅप्स डाऊनलोड करू नयेत. आपला मोबाइल हा डिजीटल युगाचा भाग आहे. त्यामुळे त्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे. सायबर अ‍ॅटॅक हे कमी सुरक्षित असलेल्या संगणकाला हॅक करून सिस्टीमचा ताबा घेतात. त्यामुळे आपला संगणक सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी परवाना असलेले सॉफ्टवेअर वापरा, पायरेटेड सॉफ्टवेअर वापरू नका. पायरेटेड सॉफ्टवेअर स्वस्त असतात म्हणून आपण त्याला भुलतो. परंतु, वायरसचेही अंडरवर्ल्ड असते. त्यामुळे दोन तीन दिवसांत खुप पैसा कमविला जातो. त्यामुळे सॉफ्टवेअर सातत्याने अपडेट केले पाहिजे. सायबर सुक्षेच्या गाभ्यात माहिती असते. त्यात माहितीची गोपीनीयता असावी, ज्याला माहिती मिळविण्याचा अधिकार आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणीही ती माहिती मिळवू नये. त्यात सतत्या असावी म्हणजे मिळविलेली माहिती पूर्ण व अचूक आहे याची खात्री देणारी असावी, अधिकृतरित्या ज्या स्थळी माहिती मिळणे महत्त्वाचे आहे तिथे मिळावे. या सायबर सुरक्षेच्या तीन महत्त्वाच्या गोष्टी मानल्या जातात. या सुरक्षेसाठी प्रणाली बनवावी लागते. परंतु, ही प्रणाली गरजेपेक्षा कमी बनविली तर धोका वाढेल. कोणतीही सुरक्षा प्रणाली बनविताना धोका पडताळणे गरजेचे आहे. एवढं करूनही काही घडले तर त्याचे होणारे परिणाम कमीत कमी कसे करता येईल, परिणाम झाले तर त्याचे दुष्परिणाम कमी करावे आणि एवढे करुनही सिस्टीम बंद पडली तर ती कमीत कमी वेळात, कमीत कमी खर्चात पुर्व पदावर कशी आणता येईल या तीन पातळ््यांवर सायबर सिस्टीम ही यंत्रणा बनविली जाते असे ते म्हणाले.