शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

शोरुमप्रमाणे ठेवण्यात येते कार

By admin | Updated: January 11, 2017 07:26 IST

एखाद्या गुन्ह्यात जप्त केलेले वाहने आपण नेहमीच धूळखात खराब होताना पाहतो. पण, ठाणे पोलीस मीरारोड कॉल सेंटरप्रकरणी आॅक्टोबर महिन्यात जप्त केलेल्या त्या तीन क ोटीच्या आॅडी आर-८ या कारची

ठाणे : एखाद्या गुन्ह्यात जप्त केलेले वाहने आपण नेहमीच धूळखात खराब होताना पाहतो. पण, ठाणे पोलीस मीरारोड कॉल सेंटरप्रकरणी आॅक्टोबर महिन्यात जप्त केलेल्या त्या तीन क ोटीच्या आॅडी आर-८ या कारची विशेष काळजी घेत आहेत. त्या कारला नित्य नियमाने फडका मारून शोरूममध्ये दिसावी, अशी उभी केली जातेआहे. मीरा रोड येथील कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना सुमारे ५०० कोटींचा गंडा घालण्यात आला होता. दरम्यान,शहर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी या घोटाळ्यातील पैशांनी एखादी वस्तू खरेदी केली असेलतर ती जप्त केली जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार, या घोटाळ्यातील कथित सूत्रधार सागर ऊर्फ शॅगी ठक्कर याने एका मैत्रिणीला भेट देण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याकडून तीन कोटींची आॅडी आर-८ या कारची खरेदी केली होती. ही कार हरयाणातून पोलिसांनी हस्तगत करुन ठाण्यात आणली. ती अजूनही कोहलीच्याच नावावर असून शॅगीने ती एका दलालाकडून खरेदी केलीहोती. खरेदी केल्यानंतर तिची कागदपत्रे त्याच्या नावावर करण्यासाठी पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे तो देण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे फॉर्म क्रमांक २९ हा भरला असला तरी ती अजूनही कोहलीच्याच नावावर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ती ठाणे पोलीस परेड मैदानात उभी केली आहे. हे मैदान ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग कार्यालयाच्या मागील बाजूस असल्याने त्यांनाही त्या कारवर लक्ष ठेवता येते. विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या वाहनांकडे सहसा पोलीस विशेष लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्या वाहनांमध्ये साहित्य तसेच गाडीचे पार्ट चोरीला जाण्याचे प्रकार सर्वश्रुत आहेत. या आॅडी आर-८ ची विशेष काळजी घेतली जात असल्याने ती अजूनही एखाद्या शोरुममधून आणल्याप्रमाणे त्याठिकाणी उभी आहे. पोलिसांनी इतर गुन्ह्यांमधील सर्वच वाहनांची अशा प्रकारे काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)