शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोवीड केअर सेंटरची क्षमता वाढविली जाणार आयसीयुचे आता 150 बेड होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 18:41 IST

आणखी 350 च्या आसपास बेड वाढविले जाणार असल्याची माहिती पालिका सुत्रंनी दिली.

ठाणे  : पुण्यात ऑक्सीजन, बेड उपलब्ध नसणो आणि अॅम्ब्युलेन्स वेळेवर न मिळाल्यामुळे एका पत्रकाराचा मृत्यु झाला होता. त्यानंतर आता इतर ठिकाणच्या पालिकेच्या कोवीड रुग्णांलयाबाबत आक्षेप घेतले जात होते. असे असतांनाच आता ठाण्यातील कोवीड केअर सेंटरच्या बेडची क्षमता वाढविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घेतला आहे. त्यातही सध्या आयसीयुचे येथे 76 बेड असतांना त्यात आणखी वाढ होणार असून त्याची क्षमता आता 150 एवढी होणार आहे.

याशिवाय येथे एकूण आणखी 350 च्या आसपास बेड वाढविले जाणार असल्याची माहिती पालिका सुत्रंनी दिली. ठाणो महापालिकेच्या माध्यमातून ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे 1004 खाटांचे कोवीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्या ठिकाणी सध्या 343 बेड फुल असून उर्वरीत 661 बेड शिल्लक आहेत. यामध्ये आयसीयुचे सात बेड शिल्लक असून 657 बेड हे जनरल वॉर्डचे शिल्लक आहेत. परंतु आता सप्टेंबरमध्ये पुन्हा ठाण्यात कोवीड बाधीत रुग्णांची संख्या मागील काही दिवसात वाढतांना दिसत आहे. त्यामुळे शहरातील खाजगी रुग्णालयांपोठापाठ कोवीड सेंटर मधील बेडही आता भरु लागले आहेत. परंतु सध्या रुग्णांना पुरतील एवढे बेड प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहेत. परंतु ागील काही दिवसात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णांना आयसीयु बेडची कमतरता भासू नये यादृष्टीकोणातून आता पालिकेने पावले उचलण्यास सुरवात केली आहे.

सध्या कोवीड केअर सेंटरमध्ये आयसीयुचे 76 बेड असून त्यातील सध्याच्या घडीला केवळ 7 बेडच शिल्लक आहेत. परंतु नव्याने वाढणा:या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन रुग्णांना आयसीयु बेड मिळाला नाही, म्हणून तक्रार येऊ नये, किंवा एखाद्या रुग्णाचा मृत्यु ओढावून नये या दृष्टीकोणातून महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी येथील बेड वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी केलेल्या पाहणीत त्यांनी संबधींत विभागाला येथील बेड वाढविण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने तत्काळ पावले उचलण्यात यावीत असेही त्यांनी सांगितले आहे.