मुंब्राः गांजा हा अमली पदार्थ विक्री करताना मुंब्रा पोलिसांनी शकील बाटलीवाला (वय ४६, रा. ताजुशिया बिल्डिंग, चांदनगर, मुंब्रा-कौसा)याला गुरुवारी रात्री अमीना बाग येथील रजा मशिदीच्या पाठीमागून अटक केली. त्याने विक्रीसाठी जवळ बाळगलेला १४ हजार ५०० रुपये किमतीचा एक किलो ६०० ग्रॅम गांजा तसेच रोख एक हजार रुपये असा एकूण १५ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले करीत आहेत. मागील तीन दिवसापासून अमली पदार्थ विकणाऱ्यांविरोधात सुरू केलेली ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी लोकमतला दिली.
गांजा विकणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:48 IST