शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

चपलांसाठी ‘तो’ वाटतोय उमेदवाराची पत्रके

By admin | Updated: February 14, 2017 03:00 IST

विवेक शिवराज चव्हाण... वय अवघे आठ वर्षे... वर्तकनगर येथील महापालिका शाळेतील दुसरीच्या वर्गातील हा विद्यार्थी... निवडणूक प्रचारातील

जितेंद्र कालेकर / ठाणेविवेक शिवराज चव्हाण... वय अवघे आठ वर्षे... वर्तकनगर येथील महापालिका शाळेतील दुसरीच्या वर्गातील हा विद्यार्थी... निवडणूक प्रचारातील अनेक कार्यकर्त्यांपैकी हाही एक धडाडीचा छोटा कार्यकर्ता... वर्तकनगर येथील प्रभाग क्रमांक ७ मधील एका अपक्ष उमेदवाराच्या प्रचाराची पत्रके वाटत तो सध्या फिरत आहे... निवडणूक झाल्यावर त्याला नवी कोरी चप्पल घेऊन देण्याचे आश्वासन उमेदवाराने दिले आहे.सोमवारी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास साईबाबा मंदिर परिसरातील दुकानांमध्ये विवेक पत्रके वाटत होता. समोर येणाऱ्यांच्या हातात उमेदवाराचे पत्रक टेकवतानाच ‘आपल्या उमेदवारावर निवडणुकीत तेवढे लक्ष ठेवा’ असे तो आवर्जून सांगत होता. घाईगर्दीत असलेल्या विवेकला थांबवून त्याच्याशी बातचीत करण्याचा प्रस्तुत प्रतिनिधीने प्रयत्न केला. विवेक म्हणाला की, तो भीमनगर भागात वास्तव्याला असून आई घरोघरी धुणीभांड्यांची कामे करते तर वडील मिस्त्रीचे काम करतात. आणखी किती दिवस पत्रके वाटणार, असे विचारले असता आणखी पाच ते सहा दिवस पत्रके वाटायची आहेत, असे तो बोलला. पत्रके वाटून काय मिळणार, असा सवाल केला असता नवी कोरी चप्पल मिळेल, असे तितक्याच निरागसतेने त्याने उत्तर दिले. फक्त चप्पल मिळण्यासाठी पत्रक वाटणार का, असे विचारल्यावर तसे नाही... साहेब, बोलले तुला पाहिजे ते देईन. पण, चप्पल नक्की मिळणार. मग, तू काय मागणार, असे विचारल्यावर विवेकची कळी खुलली. किंचित लाजून... आढेवेढे घेत तो म्हणाला की, मी गिअरची सायकल मागणार. साहेब, मला नक्की सायकल देतील. खूप घाईत असल्याचे सांगून प्रचारासाठी फिरणाऱ्या घोळक्याला शोधत त्याच लगबगीने तो निघूनही गेला. राजकीय पक्षांचे काही कार्यकर्ते व उमेदवार यांना विचारले असता ते म्हणाले की, अनेक उमेदवार लहान मुलांची प्रचाराकरिता मदत घेतात. मोठ्या सोसायट्या, कॉम्प्लेक्स येथे तरुण गेले तर सोसायटीचे वॉचमन, सिक्युरिटी गार्ड त्यांना आत सोडत नाहीत. हाकलून लावतात. उमेदवाराची पत्रके लोकांपर्यंत जाण्याकरिता लहान मुलांवर जबाबदारी टाकली, तर ते कसेही करून पत्रके पोहोचवतात. लहान मुलाने दिलेले पत्रक कुणीही स्वीकारतो, लागलीच फेकून देत नाही. पुस्तके, शालेय वस्तू, एक पॅण्ट-शर्ट, बॅट-बॉल अशी बक्षिसे देण्याचे आमिष दाखवून लहान मुलांची निवडणुकीत मदत घेतली जात आहे.