शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; केडीएमसी आयुक्तांचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 23:53 IST

स्वच्छता मोहीम । शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा

कल्याण : केडीएमसीने स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेंतर्गत जनजागृतीला सुरुवात केली आहे. ही मोहीम प्रभावी राबवण्यासाठी आयुक्त गोविंद बोडके यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या ३१ जानेवारीपर्यंत रद्द केल्या आहेत. या कालावधीत सुटी घेतल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा फतवा जारी केला आहे. शनिवारी, रविवारची सार्वजनिक सुटीही रद्द केली आहे.

स्वच्छता सर्वेक्षणासाठी दोन दिवसांत दिल्लीहून पथक येणार आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी परिपत्रक काढून आदेश जारी केले आहेत.स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेत कल्याण-डोंबिवलीतील प्रभागांमध्ये पथनाट्य, वासुदेवाच्या माध्यमातूनही स्वच्छतेविषयी प्रबोधन केले जात आहे. केडीएमसीच्या मालमत्ता, सरकारी कार्यालये आणि शाळांच्या वास्तूंच्या भिंतींवर रंगरंगोटी करून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. सर्वेक्षणात गुणांकन उंचावण्याचे ध्येय महापालिकेने बाळगले आहे. पालिका स्वच्छता परिषद घेणार असून यात व्यापारी संघटना, सामाजिक संघटना, प्रतिष्ठित नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे. ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ अशी स्पर्धाही घेतली जाणार आहे. स्वच्छता अ‍ॅप डाउनलोड करून स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये आपला सहभाग दर्शवून महापालिकेचे गुणांकन उचवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केडीएमसीतर्फे करण्यात आले आहे. सर्वेक्षणाच्या कालावधीत मूल्यमापनाच्या दृष्टीने प्रत्येक दिवशी परिपूर्ण तयारी करणे आवश्यक असल्याने अधिकारी आणि कर्मचाºयांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. सर्वेक्षण कालावधीत सहायक आयुक्त आणि सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी यांनी प्रत्येक ठिकाणची पाहणी करून अहवाल दररोज उपायुक्तांमार्फत सादर करण्यात यावा, असे आदेश आयुक्त बोडके यांनी दिले आहेत.

ज्याठिकाणी कर्मचारी उपस्थित नसतील अथवा सर्वेक्षणअंतर्गत ठिकाणी साफसफाई नसल्यास मुख्य आरोग्य निरीक्षकांना व्यक्तिश: जबाबदार धरून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रक आयुक्तांनी जारी केले आहे.शनिवारी-रविवारीही कार्यालये सुरूसर्वेक्षणाच्या अनुषंगाने शनिवारी आणि रविवारचीही सुटी रद्द करण्यात आल्याने शनिवारी घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि सर्वेक्षणाशी निगडित असलेले विभाग सुरू होते. रविवारीही संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कामावर हजर राहण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका