शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तिप्पट भाडेवसुली करणाऱ्या पार्किंग ठेकेदारांचा ठेका रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:55 IST

ठामपाची कारवाई : २४ तासांत वाहनतळ रिकामा करण्याची नोटीस

ठाणे : नौपाड्यातील गावदेवी भाजी मंडईखाली असलेल्या पार्किंगचे तिप्पट दर आकारले जात असल्याचे ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने केलेल्या पाहणीत निदर्शनास आल्याने या विभागाने संबंधित ठेकेदाराचा ठेका एकतर्फी रद्द केला असून २४ तासांच्या आत वाहनतळ रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे. या ठेकेदाराने दुचाकीकरिता दररोज ३० रुपये भाडे आकारणे बंधनकारक असताना तो बेकायदा ९० रुपये वसूल करत होता.ठाणे महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाच्या अखत्यारित असलेल्या गावदेवी मंडईच्या तळघरातील वाहनतळाचे क्षेत्रफळ १०५१.४ चौरस मीटर असून सदर वाहनतळात ३०० च्या आसपास दुचाकी पार्क होत असतात.

हे वाहनतळ मे. रिटा मार्केटिंग या ठेकेदारास तीन वर्षांच्या कालावधीसाठी चालवण्यासाठी देण्यात आले होते. त्यापोटी त्याने पालिकेला दरमहा तीन लाख ५२ हजार रुपये देणे बंधनकारक होते. पालिकेने घालून दिलेल्या अटी आणि शर्तीचे त्याने उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. दोन महिन्यांपूर्वी एका वाहनचालकाने पालिकेकडे ई-मेलद्वारे वाढीव भाडे आकारले जात असल्याची तक्रार केली होती. आस्थापना विभागाचे कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर यांनी या तक्रारीची आपल्या टीमद्वारे खातरजमा केल्यानंतर बुधवारी ठेका रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. हा ठेकेदार हा दुचाकीसाठी प्रतिदिन ३० रुपये आकारणे अपेक्षित असताना ९० रुपये आकारत होता. तसेच त्याची पावतीही दिली जात नव्हती.

याशिवाय, पार्किंगच्या ठिकाणी दरपत्रक लावणे अपेक्षित होते, तेसुद्धा केले नव्हते. सुरक्षारक्षक तैनात नसणे, सीसीटीव्ही कॅमेरे न लावणे, अशा अनेक त्रुटी पाहणीत निदर्शनास आल्याची माहिती आस्थापना विभागाच्या चौकशी अहवालातून उघड झाली आहे. तसेच येथे ज्या फेरीवाल्यांचे सामान ठेवले जात होते, त्यांना बेकायदा भाडे आकारले जात असल्याचे उघड झाले आहे.वाहनतळ रिकामे न केल्यास गुन्हा दाखलया भागात जे फेरीवाले दिवसभर बसतात, त्यांचे साहित्य रात्रीच्या वेळेस याच ठिकाणी ठेवले जात होते व त्यांच्याकडून दररोज बेकायदा भाडे आकारले जात होते, अशी माहिती तपासात उघड झाल्याचे आहेर यांनी सांगितले. आयुक्त संजीव जयस्वाल यांना अहवाल सादर झाला होता. ठेका रद्द करण्यात आल्याने येत्या २४ तासांत वाहनतळ रिकामे करण्यास ठेकेदाराला सांगण्यात आले आहे. परंतु, त्याने तसे न केल्यास ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.