शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

"गावठाण, कोळीवाड्यांची सुनावणी रद्द करा"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:12 IST

ठाणे शहर गावठाण-कोळीवाडे-पाडे संवर्धन समितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी.

ठाणे : ठाण्यात राबविण्यात येत असलेली क्लस्टर योजना अद्यापही सुरू झालेली नाही. तीमधून गावठाणे-कोळीवाडे वगळले आहेत किंवा नाही, याबाबत अद्यापही अध्यादेश काढलेला नाही. यामुळे या योजनेच्या विशेष नियमावलीअंतर्गत नागरी पुनर्निर्माण आराखडा (यूआरपी) याबाबत सूचना/ हरकतींवर होणारी कोळीवाडा, गावठाण, पाडे येथील भूमिपुत्रांसह सर्व ठाणेकरांची सुनावणी रद्द करावी. तसेच जर गावठाण, कोळीवाडे, पाडे वगळले असतील, तर तसा शासन निर्णय आदेश तत्काळ काढावा, अशी मागणी ठाणे शहर गावठाण-कोळीवाडे-पाडे संवर्धन समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.या मागणीसाठी येथील भूमिपुत्रांनी मागील दीड वर्षापासून लढा उभारला असून त्याची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावठाण, कोळीवाडे, पाडे क्लस्टर योजनेतून वगळण्यात येतील, असे तोंडी आश्वासन दिले होते. परंतु, आजपर्यंत त्याचे शासन निर्णय आदेशामध्ये रूपांतर झाले नसल्याची खंत येथील रहिवाशांनी या निवेदनाद्वारे मांडली आहे. तसेच विधानसभा व विधान परिषद सभागृहांत जोपर्यंत गावठाण, कोळीवाडे यांचे विस्तारित सीमांकन होत नाही, तोपर्यंत क्लस्टर योजना तशाच विकासाच्या नावाखाली होणाऱ्या कोणत्याही योजना राबवता येऊ नयेत व येणारदेखील नाहीत, त्याबाबत सखोल चर्चा होऊन आश्वासनही देण्यात आले आहे. परंतु, तरीदेखील क्लस्टर योजना जोरजबरदस्तीने रेटण्याचा अट्टहास का, असा सवाल समितीने केला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री म्हणून आता आपण गावठाण, कोळीवाडे, पाडे क्लस्टर योजनेतून वगळले, असा शासन निर्णय लवकर काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.शिवाय, ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव प्र.क्र. ५८६ मध्ये गावठाण, कोळीवाडे वगळण्याचे प्रस्तावित केले आहे. असे असतानाही संबंधित अधिकारी गावठाण, कोळीवाडा येथील स्थानिक भूमिपुत्रांना क्लस्टर योजनेबाबत सुनावणीसाठी का बोलावत आहेत, याचा जाब विचारून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.