शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३६ तासांची पाणीकपात रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:05 IST

मीरा-भार्इंदरची पाणीकपात ३६ तासांवर गेली असून ती रद्द करावी, अशी मागणी माजी खासदार संजीव नाईक यांनी बुधवारी आयुक्त महापालिका आयुक्त बळीराम पवार यांच्याकडे केली.

मीरा रोड : मीरा-भार्इंदरची पाणीकपात ३६ तासांवर गेली असून ती रद्द करावी, अशी मागणी माजी खासदार संजीव नाईक यांनी बुधवारी आयुक्त महापालिका आयुक्त बळीराम पवार यांच्याकडे केली.भुयारी मार्गाचे काम पूर्ण करा, उत्तनवासीयांची कचऱ्यातून सुटका करा आदी विविध मागण्याही त्यांनी केल्या. यावेळी पक्षातर्फे ११ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मीरा-भार्इंदर महापालिकेत आयुक्तांच्या दालनात माजी खासदार नाईक यांनी पक्षाचे माजी नगरसेवक प्रकाश दुबोले, पौर्णिमा काटकर, नरेंद्र भाटिया, संतोष गोळे, साजिद पटेल, शिल्पा सावंत, रमेश गायकवाड, भिलारे, साळुंके आदी पदाधिकारी - कार्यकर्त्यांसमवेत आयुक्तांशी चर्चा केली.मीरा-भार्इंदरची पाणी कपात ३६ तासांवर गेली आहे. या आधी आम्ही प्रत्येकवेळी मीरा-भार्इंदरला पाणी कपातीतून वगळत नागरिकांना दिलासा दिला होता. त्यामुळे आताही पाणीकपात रद्द करा, असे नाईक म्हणाले.भूमीगत गटार योजनेच्या कामाचा खर्च ५०० कोटींवर गेला आहे, तरीही काम रखडले आहे. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई करा. उत्तन व परिसरातील रहिवाशी डम्पिंगमुळे त्रस्त असून त्यांना दिलासा द्या. शहरात फेरीवाले व अनधिकृत बांधकामे वाढत असताना त्यावर नियंत्रण न ठेवणारया अधिकाºयांवर कारवाई करा. टीडीआर घोटाळे, विकास आराखडा, पालिकेकडून केली जाणारी अनावश्यक व निकृष्ट दर्जाची बांधकामे, रखडलेले रस्ते, परिवहन सेवेची दुरवस्था आदी अनेक मुद्द्यांवर नाईक यांनी आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली.मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री गेली दोन वर्षे सतत शहरात येत असून विविध भूमीपुजने, उद्घाटने करीत आहेत. या कार्यक्रमांसाठी होणारा लाखो रुपयांचा खर्च कुठून केला? असा सवाल करत या खर्चाची चौकशी करुन कारवाई करा, असे निवेदनात म्हटले आहे.काशिमीरा नाका येथील शिवाजी महाराजांचा पुतळा उंच करणे किंवा उड्डाण पुलापेक्षा उंच नवा पुतळा बसवण्यावर समिती विचार करत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. पाणी कपात रद्द करण्यासोबतच अन्य मागण्यांवरही विचार करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.