शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

जिल्ह्यात गडकोटांच्या संवर्धनासाठी मोहीम; पालघरमध्ये ६० हून अधिक किल्ल्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 00:30 IST

किल्ले वसई मोहीम परिवारअंतर्गत २००३ सालापासून पालघरमधील ऐतिहासिक गडकोट व पर्यटनस्थळे, मंदिरे, मूर्तीच्या संवर्धनासाठी श्रमदान मोहिमेच्या माध्यमातून कार्य केले जाते.

पालघर : जिल्ह्यातील ६० हून अधिक गडकोटांपैकी प्राथमिक स्वरूपात १० गडकोटांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून त्याच्या संवर्धनासाठी ठोस कार्यक्रम आयोजित करावा, या मागणीसाठी गडकिल्ले वसई मोहीमचे श्रीदत्त राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी अंदाज समितीप्रमुख रणजित कांबळे यांनी यासंदर्भात तात्काळ कार्यवाहीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.किल्ले वसई मोहीम परिवारअंतर्गत २००३ सालापासून पालघरमधील ऐतिहासिक गडकोट व पर्यटनस्थळे, मंदिरे, मूर्तीच्या संवर्धनासाठी श्रमदान मोहिमेच्या माध्यमातून कार्य केले जाते. मागील १८ वर्षांत दुर्गसंवर्धन, इतिहास मार्गदर्शन मोहीम, ऐतिहासिक व्याख्यानमाला, कडेकोट विजयदिन परंपरा, मोडी लिपी संवर्धन या माध्यमातून आजवर ३ हजार ५०० हून अधिक विनामूल्य उपक्रम मोहिमेअंतर्गत आयोजिले आहेत. सर्व उपक्रमाचा मुख्य हेतू जिल्ह्यातील ऐतिहासिक गड-कोट स्थळांचे संवर्धन व्हावे, असा असल्याचे श्रीदत्त राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.जिल्ह्यात गडकोट, बुरुज, दुर्गकिल्ले इ. ६० प्रकार उपलब्ध असून यातील माहीम, सफाळे, केळवे, बोईसर भागांत मोठ्या प्रमाणावर किल्ले आहेत. याची डागडुजी अनेक वर्षे झालेली नसून त्यावरील स्थळे, पाणवठे, तोफा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आम्ही किल्ले वसई मोहीमअंतर्गत दर रविवारी व सुटीच्या दिवशी स्वतः प्रत्यक्ष सहभागातून व स्थानिक दुर्गमित्रांच्या मदतीने श्रमदान मोहीमअंतर्गत सदर गडाचे संवर्धन केलेले आहे. पण आपल्या शासकीय यंत्रणा अंतर्गत त्या किल्ल्याचे अधिकृत नोंदणी करून आर्थिक मदतनिधी उपलब्ध करून दुर्ग संवर्धनात पाठबळ निर्माण करण्यासाठी श्रीदत्त राऊत, प्रसिद्ध आर्किटेक्ट निशांत पाटील, विनीत पाटील, अभिजित पाटील, प्रोत्साहन पाटील, प्रीतम पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ  यांना निवेदन दिले होते. या मागणीसंदर्भात अंदाज समितीचे प्रमुख आमदार कांबळे, आ. कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी गुरसळ यांची भेट घेत गडकिल्ल्याचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या श्रीदत्तसारख्या दुर्गप्रेमींना निधीसाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.