शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राष्ट्रवादी गटनेत्यांची केबिन सील

By admin | Updated: July 6, 2017 06:05 IST

बेकायदा घेतलेला केबिनचा ताबा व एकूण संख्याबळाच्या १० टक्या पेक्षा कमी संख्येने निवडून आलेले नगरसेवक, असे कारण देत तब्बल

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : बेकायदा घेतलेला केबिनचा ताबा व एकूण संख्याबळाच्या १० टक्या पेक्षा कमी संख्येने निवडून आलेले नगरसेवक, असे कारण देत तब्बल पाच पक्षाच्या केबिनना पालिका आयुक्तांनी सील ठोकले आहे. याविरोधात आवाज उठवण्याचा इशारा काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिप, पीआरपी व रिपाइने दिला आहे.उल्हासनगर महापालिकेत विरोधी बाकावर बसलेले काँॅग्रेस, भारिप, पीआरपी पक्षाचे प्रत्येकी एक, रिपाइ पक्षाचे २, राष्ट्रवादीचे ४ तर शिवसेनेचे २५ नगरसेवक निवडून आले आहेत. पालिका सत्तेतील भाजपा-ओमी टीमचे ३२ व साई पक्षाचे १३ नगरसेवक निवडून आले. कायद्यानुसार पालिकेत निवडून आलेल्या एकूण नगरसेवकांच्या १० टक्के नगरसेवक निवडून आल्यावर गटनेत्यासाठी कार्यालय मिळते. या नियमावर पालिका आयुक्तांनी बोट ठेवत दिलेली कार्यालये हिसकावून घेतल्याचा आरोप भारिपचे जिल्हाध्यक्ष सुधीर बागूल यांनी केला आहे. महापालिकेची प्रथा पाहता सर्वच राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना यापूर्वी कार्यालय दिली आहेत. त्यानुसारच कार्यालय घेतले असून पालिकेने सर्व सुविधा दिल्या आहेत. तसेच कार्यालयासमोर गटनेत्याचे नामफलक लावले आहेत. मग दोन महिन्यानंतर कसा निर्णय घेतला, असा प्रश्न राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री यांनी उपस्थित केला आहे. मात्र पालिकेतील ही प्रथा मोडीत काढण्याचे संकेत आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिले आहे. महापौरांसह स्थायी समिती, प्रभाग व विशेष समिती निवडणुकीत सत्ताधारी भाजपा-ओमी टीम व साई पक्षाच्या विरोधात पाचही पक्ष उभे ठाकल्याने कार्यालय सील केल्याचा आरोप या पाचही पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे.