शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

सरकारी यंत्रणांकडून व्यापा-याचा खून मोर्चातील व्यापा-यांचा आरोप : खड्डे बळी प्रकरणी पालिका, एमआयडीसी, बांधकाम विभागाची टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 03:19 IST

रस्त्यावरील खड्ड्यामुळे व्यापा-याचा जीव जाऊनही महापालिका, एमआयडीसी, प्रदूषण मंडळ आणि बांधकाम विभागाने त्याची जबाबदारी परस्परांवर ढकलत शुक्रवारी पुन्हा आपल्या निर्ढावलेपणाचे दर्शन दिले.

डोंबिवली : रस्त्यावरील खड्ड्यामुळे व्यापा-याचा जीव जाऊनही महापालिका, एमआयडीसी, प्रदूषण मंडळ आणि बांधकाम विभागाने त्याची जबाबदारी परस्परांवर ढकलत शुक्रवारी पुन्हा आपल्या निर्ढावलेपणाचे दर्शन दिले. यंत्रणांच्या या बेपर्वाईमुळे संतापलेल्या व्यापारी आणि मोर्चेकºयांनी व्यापारी ललितचा मृत्यू अपघाती हा सरकारी यंत्रणांनी हलगर्जीतून केलेला त्याचा खून आहे, असा आरोप केला. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मनसेने १५ दिवसांत जबाबदारी निश्चित करा, अन्यथा आंदोलनाला सामोरे जा, असा इशारा नव्याने दिला.कल्याण-खंबाळपाडा रस्त्यावरील खड्ड्यामुळे व्यापारी ललित संघवी यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मार्बल व्यापारी संघटनेने एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढला होता. घरडा सर्कलपासून निघालेल्या या मोर्चाने एमआयडीसी कारार्यलयावर धडक दिली. त्यात मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, शहराध्यक्ष मनोज घरत, भाजपाचे नगरसेवक महेश पाटील, केडीएमसीतील सभागृह नेते राजेश मोरे व शिवसेना नगरसेवक विश्वनाथ राणे तसेच संघवी यांचा भाऊ भावेश यांच्यासह व्यापाºयांचा समावेश होता. नंतर एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते आणि महापालिकेच्या अधिकाºयासोबत त्यांची बैठक झाली.ललित संघवीचा मृत्यू रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांची जबाबदारी एकही सरकारी यंत्रणा घेत नाही. सगळे एकमेकांकडे बोट दाखवून कातडी वाचवत असल्याचे गुरुवारी घटनास्थळी झालेल्या पाहणीदरम्यान उघड झाले होते. सरकारी अधिकाºयांनी शुक्रावारीही टोलवाटोलवीची उत्तरे देत जबाबदारी स्वीकारण्याऐवजी एकमेकांकडे बोटे दाखवण्याचेच काम केले. या प्रकारामुळे मोर्चाचे शिष्टमंडळ संतप्त झाले होते. मनसेने अधिकाºयांना आता १५ दिवसांची डेडलाइन दिली. सर्व सरकारी यंत्रणांनी मिळून ललित संघवी मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ललितच्या मृत्यूला सात दिवस उलटूनही पोलिसांकडून तपास होत नाही. पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी व रस्त्याच्या कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केल्याचे नमूद केले आहे. मात्र, त्यात अधिकाºयांची नावे स्पष्टपणे लिहिलेली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी याचा तपास योग्य प्रकारे करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे या प्रकरणातून धडा घेत सरकारी यंत्रणांनी कारभार सुधारला नाही आणि पोलिसांनी अधिकाºयांची नावे घेऊन गुन्हे दाखल केले नाहीत, तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.‘तीव्र आंदोलन छेडणार’ : यंत्रणांच्या टोलवाटोलवीमुळे खड्डेप्रकरणी मृत्युला नेमके कोण जबाबदार आणि खड्ड्यांना कोण कारणीभूत आहे, याचा शोध पोलिसांनीच घेऊन योग्यप्रकारे गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेने केली. सरकारी यंत्रणांच्या कारभारात १५ दिवसांत सुधारणा न झाल्यास मनसेकडून तीव्र आंदोलन केले जाईल. अधिकाºयांना कार्यालयात बसू दिले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.