शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली-कल्याण रेल्वे समांतरमार्गे बस लवकरच

By admin | Updated: June 27, 2017 03:06 IST

ठाकुर्लीतील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी रेल्वेने रविवारी घेतलेल्या मेगाब्लॉकच्या वेळी प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण-डोंबिवली

अनिकेत घमंडी । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : ठाकुर्लीतील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी रेल्वेने रविवारी घेतलेल्या मेगाब्लॉकच्या वेळी प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन सेवेने डोंबिवली रेल्वे स्थानक ते कल्याणदरम्यान रेल्वे समांतर मार्गाने मिडी बस सोडल्या. या बसच्या दिवसभरातील १११ फेऱ्यांमुळे केडीएमटीला दीड लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. या सेवेमुळे प्रवाशांनी समाधान मानल्याने आता लवकरच या मार्गावरून कायस्वरूपी बससेवा सुरू करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. दरम्यान, रविवारी या मार्गाची चाचणी झाल्याची चर्चा आहे.कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर मार्गामुळे या दोन्ही शहरांचे अंतर कमी झाले आहे. शिवाय वेळ व इंधनाची बचत होणार असल्याने या मार्गाने कायमस्वरूपी बससेवा सुरू करणार असल्याची माहिती केडीएमटीचे व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी ‘लोकमत’ला दिली. अन्य मार्गांवरही बस सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्याआधी सध्या अंतिम टप्प्यात असलेली वाहकांची भरती प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. ती झाल्यानंतर तातडीने बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.मेगाब्लॉकमुळे रविवारी कल्याण-डोंबिवलीदरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे हजारो प्रवाशांनी रिक्षांऐवजी केडीएमटीच्या बससेवाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेरून या बस सुटल्याने प्रवासी समाधानी होते. रिक्षा प्रवासासाठी जास्त पैसे मोजण्यापेक्षा बसने कमी पैशात आणि कमी वेळेत प्रवास करण्याला प्रवाशांनी जास्त पसंती दिली. या प्रवासादरम्यान या मार्गावर कायमस्वरूपी सेवा देण्याची मागणी प्रवाशांनी केली. त्यावर केडीएमटी प्रशासनाने लवकरच बसेसवा सुरू करणार असल्याचे सांगितले. पूर्वेकडील राथ रोड, भाजी मार्केटमार्गे ठाकुर्ली, रेल्वेसमांतर रस्ता, पत्री पूलमार्गे कल्याण या मार्गाने बस चालवण्याचे नियोजन असल्याचेही सभापती संजय पावशे म्हणाले. परिवहन सेवा नागरिकांच्या सेवेसाठीच आहे. प्रवाशांनी प्रतिसाद दिल्याने ही सेवा कायम व्हावी, तातडीने सुरू करावी, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.