शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सीमाप्रश्न तापलेला असतानाही ठाण्याहून चंदगडपर्यंत बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2022 09:04 IST

बसच्या पहिल्या फेरीचे उद्घाटन वंदना बसस्थानक येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या हस्ते मंगळवारी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एकीकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात संबंध बिघडत असताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने ‘चंदगड’ या ठिकाणी ये-जा करता यावे, यासाठी लालपरीच्या प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली आहे. 

हा प्रवास महाराष्ट्र-कर्नाटकमार्गे पुन्हा महाराष्ट्र असा असणार आहे. ठाणे येथून थेट चंदगडला लालपरीतून अवघ्या ९९० रुपयांमध्ये प्रवास करण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे ठाणे, स्वारगेट, सातारा, कराड, कोल्हापूर, कागल, निपाणी, गडहिंग्लज, नेसरी, चंदगड तेथील नागरिकांना प्रवासासाठी दिलासा मिळणार आहे. 

धाडसी निर्णय n कोल्हापूर येथे काही प्रवासी संघटनांनी चंदगड येथे ये-जा करण्यासाठी एसटी (लालपरी) बस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती. n त्या मागणीला अनुसरूनच हा मार्ग नियोजित केला आहे. पण, चंदगड हे जरी महाराष्ट्रामध्ये असले तरी तेथे जाण्यासाठी कर्नाटकमार्गे पुन्हा महाराष्ट्रात यावे लागते. n एकीकडे दोन्ही राज्यात सीमावाद पेटला असताना, ठाणे विभागाने एक धाडसी निर्णय घेतला आहे.

बसच्या पहिल्या फेरीचे उद्घाटन वंदना बसस्थानक येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या हस्ते मंगळवारी झाले.

ही बस ठाणे वंदना बसस्थानकातून ही बस ठाणे वंदना बसस्थानकातून सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी  सुटणार असून, चंदगड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता पोहोचेल.  त्याचप्रमाणे चंदगड येथून दुपारी साडेतीन वाजता निघून ठाणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजेपर्यंत येईल, असे ठाणे विभागाने म्हटले आहे. लालपरीच्या प्रवासासाठी ऑफलाइन तसेच ऑनलाइन आरक्षणव्यवस्था उपलब्ध आहे.