शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये गोळी झाडणारा अटकेत

By admin | Updated: April 9, 2017 02:41 IST

ठाण्यात खरेदी करून घरी परतणाऱ्या एका ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) बसमध्ये गोळीबार करणाऱ्या बदलापुरातील सुमेध करंदीकर (३३) याला

ठाणे : ठाण्यात खरेदी करून घरी परतणाऱ्या एका ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) बसमध्ये गोळीबार करणाऱ्या बदलापुरातील सुमेध करंदीकर (३३) याला कासारवडवली पोलिसांनी शनिवारी अटक केली. तो सराईत गुन्हेगार असून त्याला १४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.जखमी पार्वती ठाकूर (७०) आणि त्यांची सून सुलभा (२८) या दोघी शुक्रवारी ठाण्यात खरेदीसाठी आल्या होता. याचदरम्यान, त्या ठाणे स्थानकातून ठाणे-बोरिवली एसटी बसने बोरिवली येथे घरी जाताना नशेत असलेल्या सुमेधने इतर प्रवाशांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. याचदरम्यान, बस घोडबंदर रोडवरील भार्इंदरपाडा येथे येताच त्याने गावठी कट्टा काढून पार्वती ठाकूर यांच्या दिशेने एक गोळी झाडली. ती त्यांच्या खांद्याला लागली. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याचदरम्यान, बसमधील प्रवाशांनी सुमेधला पकडून चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. त्याने हा कट्टा कुठून आणला, तो कुठे जात होता. त्याचबरोबर त्याने ठाकूर यांच्यावर कोणत्या रागातून गोळीबार केला. तसेच त्याच्याविरोधात आणखी कोणत्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत का, याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास अशोक साळवे करीत आहेत. (प्रतिनिधी)