शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरमध्ये मध्यरात्री इमारतीत सज्जा कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली 

By धीरज परब | Updated: November 18, 2023 19:59 IST

शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर शनिवारी पहाटे दिडच्या सुमारास दुकानांच्या छताचा भाग पदपथावर कोसळला .

मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या रहदारीच्या असलेल्या नवघर मार्गावरील भानूपार्क ह्या सुमारे ३५ वर्ष जुन्या इमारतीचा सज्जा मध्यरात्री नंतर कोसळल्याने जीवित हानी टळली. अग्निशमन दलाने इमारत रिकामी करून रहिवाश्याना अन्यत्र हलवले आहे. 

भानूपार्क ही चाळ पद्धतीची सुमारे ३५ वर्ष जुनी इमारत असून त्यात २४ सदनिका व तळ मजल्यावर दुकाने आहेत . नवघर मार्गावर वर्दळीच्या ठिकाणी ही इमारत असून त्याला दोन वेळा पालिकेने नोटीस बजावली होती . परंतु इमारत मात्र रिकामी केली गेली नव्हती . ह्यात बहुतांशी भाडेकरू ठेवण्यात आलेले होते . 

शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर शनिवारी पहाटे दिडच्या सुमारास दुकानांच्या छताचा भाग पदपथावर कोसळला . मध्यरात्री नंतरची वेळ असल्याने दुकाने बंद होती व लोकांची रहदारी नसल्याने सुदैवाने कोणती जीवित हानी झाली नाही . अग्निशमन दलास घटनेची माहिती मिळताच त्यांनी पडलेला भाग हटवून रहिवाश्याना सुरक्षेच्या अनुषंगाने बाहेर काढले व रात्री त्यांची व्यवस्था जवळच्या लोकमान्य टिळक सभागृहात केली . त्या नंतर त्यांना एमएमआरडीच्या रेंटल योजनेतील घरां मध्ये तात्पुरते हलवण्यात आले आहे . इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून त्याचा अहवाल आल्या नंतर महापालिका निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले .