शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:34 IST

शहरातील बांधकाम व्यावसायिक प्रदीप जोशी यांना पाच कोटींच्या खंडणीप्रकरणी धमकावणाऱ्या दुकलीला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे

डोंबिवली : शहरातील बांधकाम व्यावसायिक प्रदीप जोशी यांना पाच कोटींच्या खंडणीप्रकरणी धमकावणाऱ्या दुकलीला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. भगवान विठ्ठल विशे ऊर्फ देवा पाटील आणि फिरोज रज्जाक शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. शनिवारी या दोघांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.जोशी हे १८ वर्षे बांधकाम व्यवसायात आहेत. खंडणी मागणाºया दुकलीने जोशी यांना ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पाच कोटी रुपये वसूल करण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे फिरोजने मोबाइलवरून जोशी यांना फोन करून ‘मुझे पाच करोड रुपये दे, तेरे घर में शादी है, मुझे पैसा नही मिला तो मैं तुझे मार दुंगा’ अशा शब्दांत धमकी दिली होती. २० एप्रिलला सायंकाळी ५ वाजता त्याने हा फोन केला होता. याबाबत जोशी यांनी कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली असता खंडणीसाठी धमकी देणाºया दोन व्यक्ती खिडकाळी, देसाई परिसरात खोली भाड्याने घेऊन राहत असल्याची माहिती खबºयामार्फत त्यांना मिळाली. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक पी.जी. ठाकूर आणि एन.एच. मुदगून यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून दोघांना जेरबंद केले.भगवान हा शहापूर, तर फिरोज हा गोरेगाव परिसरात राहणारा आहे. या दोघांनी याआधी कोणाला खंडणीसाठी धमकावले आहे का? ते कोणत्या टोळीशी संबंधित आहेत, याचा तपास सुरू असल्याची माहिती जॉन यांनी दिली.