शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक करून बिल्डर झाला परागंदा; म्हाडाच्या रहिवाशांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:34 IST

बिर्ला कॉलेजसमोरील वसाहतीचा पुनर्विकास रखडला

कल्याण : आम्हाला वेळेत घर बांधून देण्याचे आश्वासन पटेल ग्रुप आॅफ कंपनीतील बिल्डर हसमुख पटेल यांनी दिले होते. मात्र, पटेल आपल्या साथीदारांसह आमची फसवणूक करून परागंदा झाला आहे, असा आरोप फसवणूक झालेल्या येथील म्हाडा वसाहतीमधील रहिवाशांनी सोमवारी प्रसिद्धिमाध्यमांसमोर केला.पटेल ग्रुप आॅफ कंपनीने पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालयासमोरील म्हाडा वसाहत २००८ मध्ये पुनर्विकासासाठी घेतली होती. त्यासाठी अन्यत्र तात्पुरते राहण्यास गेलेल्या वसाहतीमधील ४४८ चाळधारकांना महिन्याला मासिक भाडेही दिले जात होते. त्यानंतर, म्हाडाच्या चाळींचा ताबा घेऊन बिल्डरने इमारतीचे बांधकाम सुरू केले. मात्र, वेळेत ते पूर्ण झाले नाही. बिल्डरने केवळ ७० टक्केच काम केल्याचे म्हाडा वसाहतीमधील रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच, मिळालेल्या एफएसआयच्या आधारे दुसऱ्या इमारतीमधील २७० पेक्षा जास्त सदनिका बिल्डरने विकल्या आहेत. २०१५ पर्यंत संथगतीने सुरू असलेल्या इमारतीचे बांधकाम २०१७ मध्ये थांबविण्यात आले. तसेच, आम्हाला दिले जाणारे मासिक भाडेही बंद करण्यात आल्याचे म्हाडाच्या वसाहतीतील रहिवाशांनी सांगितले.ट्रायपार्टी अ‍ॅग्रीमेंटमध्ये दिलेल्या अटी आणि शर्तींचा नियमित व्याजाचा भरणा न केल्याने फसवणूक झालेल्या ११ जणांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात पटेल ग्रुप आॅफ कंपनीविरोधात मागील आठवड्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी हसमुखसह जिग्नेश मणियार, रितू वासनिक आणि राज रंगनाथन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.मागील १० वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत आहे. सुरुवातीला महिन्याला घरभाडे मिळत होते. मात्र, मागील अडीच ते तीन वर्षांपासून पटेल ग्रुप आॅफ कंपनीकडून घरभाडे मिळाले नाही.— प्रवीण जुवाटकर, म्हाडा वसाहतीमधील रहिवासी

टॅग्स :mhadaम्हाडाfraudधोकेबाजी