शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

उल्हासनगर महापालिकेचा ८४३.७२ कोटीचा २६ लाख शिल्लकीचा अंदाजपत्रक आयुक्तांकडून सादर

By सदानंद नाईक | Updated: March 23, 2023 19:21 IST

सन-२०२३-२४ च्या अंदाजपत्रकात ८४३.७२ कोटीचा खर्च तर ८४३.२६ कोटीचा अपेक्षित धरण्यात आला आहे.

 उल्हासनगर : महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी सन-२०२३-२४ चा कोणतीही दरवाढ व करवाढ नसलेला ८४३.७२ कोटीचा मात्र २६ लाख शिल्लकीचा अंदाजपत्रक महापालिका सभागृहात गुरवारी सादर केला. येणाऱ्या अंदाजपत्रकात महापालिका परिवहन बस सेवा, डम्पिंग ग्राऊंड, पाण्याचे स्वतःचे स्रोत, क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शहरप्रवेशद्वार जवळ पूर्णाकृती पुतळा, डॉ आंबेडकर भवन, सिंधू भवन, दिव्यागसाठी वाढीव मानधन आदी उपक्रम असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

 उल्हासनगर महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत, शासनाकडून मिळणारे अनुदान, पंधरावा वित्त आयोग, पायाभूत सुविधा व अमृत योजना, स्वच्छ भारत मिशन आदी उपक्रम विचारात घेऊन सन-२०२३-२४ वर्षाचा महापालिका अंदाजपत्रक सादर केल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली. यापूर्वीच्या अंदाजपत्रकानुसार अपेक्षित उत्पन्न मिळाले नसून खर्च मात्र झाल्याने, महापालिकेवर कर्ज वाढत असल्याची खंत आयुक्तांनी व्यक्त केली. सन-२०२३-२४ च्या अंदाजपत्रकात ८४३.७२ कोटीचा खर्च तर ८४३.२६ कोटीचा अपेक्षित धरण्यात आला आहे.

मालमत्ता कर वसुली-१३६.५० कोटी, विकास व तत्सम शुल्क-३०.२० कोटी, अनधिकृत बांधकामे नियमित करणे यातून ८६.२० कोटी, स्थानिक संस्था कर-२६८.४० कोटी, वाणिज्य पाणी बिल-१२ कोटी, भांडवली अनुदान व कर्ज-१२०.८० कोटी, परवाने शुल्क-२७.६७ कोटी, विविध अनुदाने-२४५.६० कोटी व इतर अनुदाने व उत्पन्न-१६४.३३ कोटी असे एकून ८४३.७२ कोटीचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. 

खर्च पगार वेतन व निवृत्ती वेतन-२०७.८८ कोटी, एमआयडीसी-५४ कोटी, पाणीपुरवठा कर्जफेड-१५.५० कोटी, पथदिवे-१६.६० कोटी, सार्वजनिक आरोग्य घनकचरा-७५.१४ कोटी, सार्वजनिक बांधकाम-१३४.३० कोटी, प्रभाग समिती-४.२२ कोटी, उद्याने विकास-६.३६ कोटी, अग्निशमन दल-३.४१ कोटी, दवाखाने-१६.९२ कोटी, पाणी पुरवठा बिल-१४६.०१ कोटी, भुयारी गटार योजना-२९.५२ कोटी, शिक्षण मंडळ-४३ कोटी, महिला व बालकल्याण-९.४३ कोटी, परिवहन-१८.५० कोटी, इतर खर्च -१९.३४, पर्यावरण-८ कोटी, अमृत योजना परतफेड ८.५० कोटी असे एकून ८४३.२६ कोटीचा खर्च दाखविण्यात आला आहे. 

महापालिका आयुक्तांनी परिवहन बस सेवा, कर्मचारी वसाहत, डॉ आंबेडकर भवन, सिंधूभवन डम्पिंग ग्राऊंड, प्रवेशद्वार जवळ छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, स्वतःचा पाणी पुरवठा स्रोत असे नावीन्यपूर्ण उपक्रम आहेत. अंदाजपत्रक सादर करतेवेळी अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर, लेखा अधिकारी किरण भिलारे, उपायुक्त अशोक नाईकवाडे, दिपक जाधव, प्रियांका राजपूत आदीजन होते.