शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

हे तर १०५६ कोटी तुटीचे अंदाजपत्रक

By admin | Updated: March 31, 2017 05:57 IST

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी २४ लाख रुपये शिलकीचे ३३९०.७८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर

नारायण जाधव / ठाणेठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी २४ लाख रुपये शिलकीचे ३३९०.७८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत ९०७.५७ कोटी रुपयांनी जास्त असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात हे अंदाजपत्रक तब्बल १०५५ कोटी ७६ लाख रुपयांचे तुटीचे आहे.मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी यंदा वास्तववादी अंदाजपत्रक सादर करताना तो गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ हजार कोटींहून अधिक कमी रकमेचा दाखवला आहे. मात्र, इकडे ठाण्यात सुमारे ३३९०.७८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करताना आयुक्तांनी महापालिकेचे उत्पन्न २३३३.९२ कोटी रुपये प्रस्तावित केले आहे. शिवाय, अनुदाने २३२.८६ कोटी रुपये, तर कर्ज, कर्जरोख्यांपासून ५३५ कोटी रुपये आणि आरंभीची शिल्लक २८९ कोटी रुपये दाखवली आहे.अर्थशास्त्रीय भाषेत आंरभीची शिल्लक ही उत्पन्न होऊ शकत नाही. उलट, इतकी रक्कम खर्च न होता ती कशी काय शिल्लक राहिली, याचे उत्तर अंदाजपत्रक सादर करताना आयुक्तांनी देणे अपेक्षित होते. शासनाकडून मिळणारी अनुदाने ही जरतरची बाब असतात. ती कधी मिळतात, तर कधी मिळतच नाही. काही वेळेला मिळाली तरी पुरेशी मिळत नाहीत. तसेच ती महापालिकेच्या उत्पन्न स्रोतापासून मिळालेली नसतात. यामुळे ती उत्पन्न म्हणून गृहीत धरता येऊ शकत नाहीत. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे यंदाच्या अंदाजपत्रकात आयुक्तांनी लेखाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून कर्ज, कर्जरोख्यांपासूनच्या ५३५ कोटी रुपयांच्या रकमेचाही उत्पन्नात समावेश केला आहे. कर्ज हे उत्पन्न कसे काय असू शकते, ते तर फेडावेच लागते. शिवाय, ते मिळेलच याची आताच कुणी शाश्वती देऊ शकत नाही. याचा विचारही यंदाचे अंदाजपत्रक सादर करताना आयुक्तांनी केलेला दिसत नाही.याशिवाय, अपंग कल्याणासाठी ३ टक्के रक्कम आरक्षित ठेवणे आवश्यक असून ती पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचवलेल्या कामांवर खर्च करणे बंधनकारक आहे. गेल्या वर्षात असे कुठेच दिसले नाही. या अंदाजपत्रकात त्याचे स्पष्ट चित्र उमटलेले नाही. असाच प्रकार महिला-बालकल्याणासाठीच्या निधीच्या बाबतीतही दिसत आहे.आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे जीएसटी विधेयक संसदेत मंजूर झाले असून जुलैपासून एकच कर लागू होणार आहे. यामुळे स्थानिक संस्थाकर कालबाह्य होणार आहेत. सध्याचे अनुदान राज्य शासन देते. त्याचे अधिकार राज्य शासनास असूनही या अंदाजपत्रकात आपण तो वाढवलेला नाही, असे सांगून व्यापाऱ्यांना दिलासा दिल्याचे भासवण्यात आले आहे. मात्र, जुलैनंतरच त्याचे खरे स्वरूप दिसणार आहे.