शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायाविरोधात बौध्द धम्मगुरूंचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2023 18:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहरातील काही व्यक्तींकडून अत्यंत घाणेरड्या शब्दांत बौध्द भिक्खुंविषयी अपमानजनक वक्तव्य केले जात असल्याचा आारोप केला ...

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शहरातील काही व्यक्तींकडून अत्यंत घाणेरड्या शब्दांत बौध्द भिक्खुंविषयी अपमानजनक वक्तव्य केले जात असल्याचा आारोप केला जात आहे. त्यास वेळीच आळा घालून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी सर्व भिक्खू म्हणजे बौध्दधम्म गुरूंनी एकत्र येत ठाणे जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तालयावर हा मोर्चा काढून निवेदन दिले.

 येथील शांतीदूत एज्युकशनल अॅन्ड सोशल अकॅडमी, मानपाडा घोडबंदर रोड येथील धम्मगुरू धम्मभिक्खू के.आर लामा यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मानसिक विकृती असणारे समाजकंटक, शांतीदूत बौध्द विहार चितळसर मानपाडा, ठाणे येथील बौद्ध भिक्खुंना दमदाटी करीत असल्यचा आरोप या मोर्चेकरी धर्मगुरूंनी केला आहे. या व्यक्ती शांतीदुत बौध्द विहारात येऊन बौध्द भिक्खुंना मारहाण,हाकलून देण्याची धमकी देत असल्याचे स्पष्ट करून विहारातील वस्तुंची, समानांची तोडफोड ते करीत असल्याचे या मोर्चेकरांनी त्यांच्या निवेदनात स्पष्ट केले आहे. सतत होत असलेला हा अन्याय दूर करून संबंधीतांवर कारवाई करण्यासाठी हा मोर्चा येथील पोलिस आयुक्तालयावर आज काढण्यात आला होता. येथील कोर्टनाका परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरतळ्यापासून हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात समस्त बौध्द भिक्खु संघ, मुंबई प्रदेश भिक्खु संघ, समस्त बौध्द उपासक-उपासिका, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.