शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर पालिका निवडणुकीतील सिंगल वॉर्डमुळे इच्छुकांची भाऊगर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:43 IST

सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक सिंगल (एकल) वॉर्डनुसार होणार असल्याचे जाहीर झाले आणि रिपाइं, ...

सदानंद नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक सिंगल (एकल) वॉर्डनुसार होणार असल्याचे जाहीर झाले आणि रिपाइं, मनसे, बसप, भारिप आदींसह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील निवडणुकीसाठी इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले. सिंगल वॉर्डचा फायदा लहान पक्षांना होणार असल्याने, भाजपच्या गोटातून मात्र नाराजीचा सूर निघत आहेत.

उल्हासनगर महापालिकेत भाजपचे बहुमत असले तरी, पक्षातील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने महापालिकेवर शिवसेना व मित्रपक्षाची सत्ता आहे, तसेच महापौर पदाच्या निवडणुकीपूर्वी स्थानिक साई पक्षाचे ११ नगरसेवक भाजपमध्ये विलीन झाल्याने भाजपचे महापालिकेत पूर्ण बहुमत आहेत. मात्र, सिंगल वॉर्ड रचनेमुळे साई पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचे संकेत पक्षाच्या आशा इदनानी यांनी दिले. सिंगल वॉर्डमुळे मोठ्या पक्षापेक्षा लहान पक्षाला फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली असून इच्छुक उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली. मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, रिपाइंचे शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव, भारिपचे शेषराव वाघमारे, पीआरपीचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले, बीएसपीचे प्रशांत इंगळे आदींनी सिंगल वॉर्ड रचनेचे स्वागत केले, तसेच त्यांच्या नगरसेवक संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली.

शहरात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, स्थानिक ओमी कलानी टीम, स्थानिक साई पक्ष, रिपाइं, मनसे आदी पक्षांची ताकद कमी-अधिक प्रमाणात आहे. आपसातील आघाडीनंतर कोणाची सत्ता महापालिकेवर येते हे सांगणे कठीण आहे. गेले दीड शतक महापालिका सत्तेची चावी स्थानिक साई पक्षाकडे राहिली असून पक्षाचे नेते जीवन इदनानी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साई पक्षाने सुरुवातीला दोन वेळा शिवसेनेला पाठिंबा देऊन लीलाबाई अशान व आशा इदनानी यांच्या रूपाने दोन वेळा महापौर पदासह उपमहापौर, स्थायी समिती सभापती पद पदरात पाडून घेतले. त्यानंतर भाजपला पाठिंबा देऊन उपमहापौर पदासह अन्य पदे पक्षाकडे ठेवण्यात इदनानी यांना यश आले. त्यानंतर इदनानी स्वतः अन्य नगरसेवकांसह भाजपात समाविष्ट झाले. मात्र, पुन्हा पक्षाच्या चिन्हावर स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचा विचार असल्याचे बोलले जाते.

------------

भाजप-शिवसेनेत चिंतेचे वातावरण

सिंगल वॉर्डाचा फटका भाजपसह शिवसेनेला यापूर्वी बसला असून त्यांच्या नगरसेवकांची संख्या २० च्या पुढे गेली नव्हती. यावेळी सिंगल वॉर्डचा फायदा रिपाइं, मनसे यांच्यासह स्थानिक साई पक्ष, ओमी कलानी, अपक्ष यांना मिळणार असल्याचे बोलले जाते.