शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

मुंब्य्रात अतिक्रमण विभागाच्या कारवाईत ६४० स्टॉल व ४५ गाळ्यांवर बुल्डोझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 16:48 IST

मुंब्य्रातील स्टेशन परिसर ते वाय जंक्शन पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत ६४० स्टॉल्स आणि ४५ व्यावसायिक गाळे जमीनदोस्त करण्यात आले.

ठळक मुद्देआयुक्तांनी लावली कारवाईला हजेरीस्टेशन परिसर झाला मोकळा

ठाणे - मागील काही दिवस मुंब्रा भागात सुरु असलेल्या कारवाईचा वेग आता आणखी वाढला आहे. मंगळवारी आयुक्त संजीव जयस्वाल हे स्वत: कारवाईसाठी या भागात उतरले होते. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्र मण निष्कासन विभागाच्या विविध सात पथकांच्या साहाय्याने मुंब्रा येथे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये गुलाब मार्केटसह जवळपास ६४० स्टॉल्स आणि ४५ व्यावसायिक गाळे बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आले.                महापालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार मंगळवारी सकाळी मुंब्रा रेल्वे स्टेशन ते वाय जंक्शनपर्यंत दोन्ही बाजूंनी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी सर्व उपायुक्तांच्या अधिपत्याखाली सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, उप अभियंता यांचा समावेश असलेली सात विविध पथके तयार करण्यात आली होती. या पथकांच्या साहाय्याने सकाळी मुंब्रा रेल्वे स्टेशनपासून कारवाईला सुरूवा झाली. या कारवाईमध्ये संपूर्ण गुलाब मार्केट जमीनदोस्त करण्याबरोबरच एकूण ६४० रस्त्यावरील स्टॉल्स बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. त्याचबरोबर एमएम व्हॅली, अमृतनगर, बॉम्बे कॉलनी या परिसरात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये जवळपास ४५ व्यावसायिक गाळे तोडण्यात आले.उपायुक्त (अतिक्र मण व निष्कासन) अशोक बुरपल्ले यांच्या समन्वयातून उपायुक्त संदीप माळवी, मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त महादेव जगताप, शंकर पाटोळे, महेश आहेर यांच्या पथकांनी ही कारवाई ८ जेसीबी, १० डंपर आणि जवळपास २०० कामगारांनी पोलिस बंदोबस्तात पूर्ण केली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त