तलासरी : येथील तहसील कार्यालयात सुनावणी सुरू असलेल्या जमिनीच्या वादाचा निकाल अर्जदाराच्या बाजूने देण्यासाठी तहसीलदारांच्या नावे दोन लाख रुपयांची लाच घेताना मनोहर कांबळे या व्हेटेरनरी डॉक्टराला तलसरी नाक्यावर रंगेहात पकडले. याबाबतचे वृत्त असे की, सिलव्हासा येथील हिंदाल्को कंपनीशी संबंधित राजेंद्र सूर्यलाल पटेल यांनी तलासरी तालुक्यातील मौजे उदधवा येथील सर्व्हे नं. १७६/२ ४६ गुंठे जमिनीचे खरेदीखत एक लाख रुपये देऊन १० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर केले होते. याबाबत वाद निर्माण झाल्याने हे प्रकरण सुनावणीसाठी येथील तहसीलदार गणेश सांगळे यांच्याकडे गेले होते. त्याची सुनावणी देखील सुरू होती. डॉ. मनोहर कांबळे याने पटेल यांच्याशी संपर्क साधून तहसीलदारांना तीन लाख तसेच पालघरचे जिल्हाधिकारी व डहाणूचे उपविभागीय अधिकारी यांना तीन लाख असे एकूण सहा लाख रुपये दिल्यास निकाल तुमच्या बाजूने लागेल असे कथितरित्या सांगितले होते, अशी माहिती अॅन्टी करप्शनने दिली.
तलासरीत लाचखोराला अटक
By admin | Updated: December 21, 2015 01:14 IST