शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जमीन मोजण्यासाठी कारकूनाने घेतली लाच

By admin | Updated: January 11, 2017 07:25 IST

जमिनीचे मोजमाप करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर लाच मागणाऱ्या महसूल विभागाच्या अव्वल कारकुनाविरुद्ध नवी मुंबईच्या

ठाणे : जमिनीचे मोजमाप करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर लाच मागणाऱ्या महसूल विभागाच्या अव्वल कारकुनाविरुद्ध नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील तक्रारदार हे मालमत्ता व्यवहाराशी संबंधित काम करतात. तक्रारदाराने चिखलोली येथील जमिनीचे मोजमाप करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागात कार्यरत असलेले अव्वल कारकून अतुल नाईक यांच्याशी २0 जून २0१६ ते १ जुलै २0१६ या कालावधीत वेळोवेळी संपर्क साधला. नाईकने या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची शहानिशा करून ९ जानेवारी रोजी ‘एसीबी’ने ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अतुल नाईकविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक संग्रामसिंह निशाणदार, अप्पर पोलीस अधीक्षक किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक भागवत सोनवणे, पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)