शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी मागितली लाच

By admin | Updated: June 17, 2016 03:11 IST

अंबरनाथमधील एका बांधकाम व्यवसायिकाचा जागेवरून वाद झाल्याने, या प्रकरणी गुन्हा दाखल करताना अंबरनाथ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने या बांधकाम व्यवसायिकाचे नाव

अंबरनाथ : अंबरनाथमधील एका बांधकाम व्यवसायिकाचा जागेवरून वाद झाल्याने, या प्रकरणी गुन्हा दाखल करताना अंबरनाथ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने या बांधकाम व्यवसायिकाचे नाव न टाकता त्याच्या लहान भावाचे नाव टाकले. या लहान भावाचे नाव गुन्ह्यातून काढण्यासाठी या बांधकाम व्यवसायिकाकडे लाच मागितली. पोलीस अधिकाऱ्याच्या या कृत्याचे चित्रीकरण आणि कॉल रेकॉडिंग करून त्या बांधकाम व्यवसायिकाने पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. एक लाख रुपये घेतल्यावर संबंधित अधिकाऱ्याने गुन्ह्यातून त्या बिल्डरचे नावदेखील वगळले आहे. कमलाकरनगर येथे द्वारकादास वाधवा यांच्या गृहसंकुलाचे काम सुरू आहे. त्यांनी नव्याने घेतलेल्या जागेवर एका घर मालकिणीसोबत त्यांचे आर्थिक व्यवहारावरून किरकोळ वादही आहेत. या घरमालकिणीने वाधवाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. मात्र, गुन्हा दाखल करताना सहायक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनी कोणतीही शहानिशा न करता, द्वारकादास यांचा लहान भाऊ सुरेश यांचे नाव एफआयआरमध्ये टाकले. या संदर्भात सुरेश यांनी विचारणा केल्यावर त्यांना कोणताच प्रतिसाद दिला नाही. अखेर आंधळे यांनी सुरेश यांच्या एका सहकार्याला आर्थिक तडजोड केल्यावर नाव वगळतो, असे सांगितले. आंधळे यांच्या या थेट पैसे मागण्याच्या वृत्तीचा पर्दाफाश करण्यासाठी सुरेश यांनी या सर्व व्यवहाराचे चित्रीकरण आणि आॅडिओ रेकॉर्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आंधळे यांनी वाधवा यांच्या निकटवर्तीयांकडे पैशांची मागणी केली. हे पैसे घेण्यासाठी स्वत: आंधळे कल्याणमधील खडकपाडा परिसरात आले होते, असा आरोप वाधवा यांनी पत्रकार परिषदेत केला. पैसे घेतल्याचे सर्व पुरावे त्यांनी पोलीस आयुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिले. पैसे घेतल्यावर गुन्ह्यातून नाव कसे काढणार, याचे आॅडिओ रेकॉर्डिंगही वाधवा यांनी केले आहे. पैसे घेतल्याचे कुणालाही कळणार नाही, याची दक्षता घेण्याचेही आंधळे यांनी वाधवा यांना बजावले आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)सहायक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह बिल्डरची सहायक पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यामुळे पोलीस व व्यावसायिक यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असून, त्यांच्यातील आर्थिक हितसंबंध या प्रकरणात पुन्हा उघड झाले.