शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांची मक्तेदारी मोडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिकेत ६० टक्के अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याची ओरड होत असताना राज्य शासनाने एक अतिरिक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : महापालिकेत ६० टक्के अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याची ओरड होत असताना राज्य शासनाने एक अतिरिक्त आयुक्तांसह चार उपायुक्त दिले. यामुळे विविध विभागांच्या कामांत पारदर्शकता येऊन नगररचनाकार विभागाचे उत्पन्न वाढले. यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांची मक्तेदारीही मोडीत निघण्याची शक्यता आहे.

उल्हासनगर महापालिकेत वर्ग-१ व २ ची ७० टक्के, तर इतर वर्गांतील ३० टक्के पदे रिक्त आहेत. शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी दिले जात नसल्याने, शहर अभियंता, बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, महापालिका सचिव, विधी अधिकारी, नगररचनाकार, करनिर्धारक संकलक, वैद्यकीय अधिकारी, मालमत्ता व्यवस्थापक यांच्यासह अनेक पदे रिक्त आहेत. मात्र दुसरीकडे आयएएस दर्जाचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर तर उपायुक्तपदी अशोक नाईकवाडे, मदन सोंडे, गणपतराव जाधव व प्रियंका राजपूत यांची नियुक्ती केली. नव्याने झालेल्या उपायुक्तांच्या नियुक्तीने महापालिका कारभारात पारदर्शकता येऊन स्थानिक मक्तेदारी निर्माण करणाऱ्या, तसेच सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या हातातील बाहुले बनलेल्या अधिकाऱ्यांवर अंकुश राहणार असल्याचे बोलले जाते.

आयुक्त डॉ. राजा दयानिधी हे नगरसेवक, स्थानिक नेते, पालिका अधिकारी, पत्रकार यांच्यासह नागरिकांसोबत संवाद ठेवत नसल्याने, त्यांच्याबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. सामाजिक संघटना व नागरिकांनी त्यांच्या तक्रारी थेट मंत्रालयापर्यंत केल्या. दुसरीकडे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्यासह अन्य उपायुक्त नागरिक, अधिकारी, नगरसेवक आदींना विश्वासात घेऊन काम करीत असल्याने, वर्षानुवर्षे वर्ग-३ व ४ कर्मचाऱ्यांचे रखडलेले पदोन्नती, अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांची भरती व इतर कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याशिवाय, वादग्रस्त व बनावट कागदपत्रे देऊन महापालिका सेवेत दाखल झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.

.........

नगररचनाकार विभाग कार्यान्वित

महापालिकेचे मालमत्ताकर व पाणीपुरवठा विभाग तसेच शासनाकडून मिळणारे जीएसटी अनुदान हे मुख्य उत्पन्नाचे स्रोत आहेत. दरम्यान, आयुक्त डॉ. राजा दयानिधी व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी नगररचनाकार विभागाकडे लक्ष केंद्रित केल्याने, गेल्या दोन महिन्यांत ३०० पेक्षा जास्त बांधकाम परवाने मंजूर होऊन १० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न महापालिकेला मिळाले.

..............