शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेच्या मोफत लाकडे योजनेला ब्रेक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:43 IST

सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : गोरगरीब व गरजू नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडे देण्याची महापालिकेची योजना आहे, मात्र ...

सदानंद नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : गोरगरीब व गरजू नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडे देण्याची महापालिकेची योजना आहे, मात्र गेल्या आठ महिन्यांपासून लाकडाचे पैसे महापालिकेने स्मशानभूमी ट्रस्टला दिले नसल्याने, योजनेला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे ट्रस्ट आर्थिक संकटात सापडल्याची प्रतिक्रिया स्मशानभूमीचे ट्रस्टी मेघराज लुंड यांनी दिली.

उल्हासनगरातील गोरगरीब व गरजू नागरिकांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्काराला मोफत लाकडे देण्याचा निर्णय महापालिकेने घेऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला. एका अंत्यसंस्काराला एकूण १६०० रुपये खर्च येतो. त्यातील लाकडाचे एक हजार रुपये महापालिका स्मशानभूमी ट्रस्टला परस्पर देणार असा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला महापालिका नियमित लाकडाचे पैसे देत असल्याने, अडचण आली नाही. मात्र गेल्या दीड वर्षापासून लाकडाचे नियमित पैसे मिळत नसल्याने, स्मशानभूमी ट्रस्ट आर्थिक अडचणीत सापडला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून मोफत लाकडाचे पैसे महापालिकेकडून मिळाले नसल्याची माहिती म्हारळगाव व शांतीनगर स्मशानभूमी ट्रस्टचे अध्यक्ष मेघनाथ लुंड यांनी दिली.

शहरातील कॅम्प नं-२ येथील म्हारळगाव खदान, कॅम्प नं-३ येथील शांतीनगर स्मशानभूमी ट्रस्टने गेल्या चार महिन्यापूर्वी प्रत्येकी ३०० जणांचे फॉर्म महापालिका आरोग्य विभागात भरले. त्याचे प्रत्येकी ९ लाख रुपये येणे बाकी आहे. ३०० फॉर्मचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत इतर फॉर्मचे बिल महापालिका स्वीकारत नसल्याने, दोन्ही स्मशानभूमीकडे प्रत्येकी ६०० पेक्षा जास्त फॉर्म जमा करण्याऐवजी पडून आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष मेघनाथ लुंड यांनी दिली. तर कॅम्प नं-४ व ५ मधील स्मशानभूमी ट्रस्टने प्रत्येकी ३०० फॉर्म महापालिका आरोग्य विभागाकडे भरून प्रत्येकी ४०० फॉर्म पूर्वीच्या फॉर्मचे पैसे न मिळाल्याने, ते ट्रस्टकडे पडून असल्याचे लुंड म्हणाले. गेल्या ८ महिन्यापासून अंत्यसंस्काराला देण्यात आलेल्या मोफत लाकडाचे पैसे न मिळाल्याने, ट्रस्ट आर्थिक अडचणीत आला आहे.

कॅम्प नं-१, ३ व ५ मधील स्मशानभूमीत ६० टक्के नागरिक मोफत लाकडाचा लाभ घेतात. तर कॅम्प नं-४ मध्ये ८० टक्के नागरिक मोफत लाकडाचा लाभ घेतात. अंत्यसंस्काराला लागणाऱ्या लाकडाची खरेदी पावसाळ्यापूर्वी केल्यास, सुकी लाकडे असतात. मात्र पैशाअभावी लाकडे खरेदी करण्यात अनियमितता येत असल्याने, नागरिकांना ओली लाकडे दिली जातात. यामुळे नागरिकांच्या रोषालाही स्मशानभूमी ट्रस्ट सामोरे जात आहे. महापालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे गोरगरीब व गरजू नागरिकांना मोफत लाकडे द्यावी का? असा प्रश्न स्मशानभूमी ट्रस्टसमोर निर्माण झाल्याची प्रतिक्रिया लुंड यांनी दिली.

----------

मोफत लाकडाचे पैसे लवकरच देणार

स्मशानभूमी ट्रस्टकडून अंत्यसंस्कारसाठी पुरविण्यात आलेल्या मोफत लाकडाचे बिल मिळाले. बिल देण्यासाठी लेखा विभागाकडे पाठविल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी दिलीप पगारे यांनी दिली. तसेच त्यांची इतर बिलेही लवकरच देण्याचे संकेत पगारे यांनी दिले.