शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

पावसाळा लांबल्याने पिकनिकला लागलाय ब्रेक

By admin | Updated: June 20, 2017 06:29 IST

जून महिना संपत आला, तरी पावसाने ठाणे, मुंबई परिसरांत दडी न मारल्याने तरुणाईच्या पावसाळी पिकनिकला ब्रेक लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जून महिना संपत आला, तरी पावसाने ठाणे, मुंबई परिसरांत दडी न मारल्याने तरुणाईच्या पावसाळी पिकनिकला ब्रेक लागला आहे. पिकनिकचे सर्व प्लानिंग झाले असले, तरी तिचा हिरो असलेल्या पावसाचा पत्ताच नसल्याने तरुणाईमध्ये नाराजीचा सूर आहे. आज, उद्या पाऊस पडेल, अशा विचारात असणारी तरुणाई पावसाची चातकासारखी प्रतीक्षा करते आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळी पिकनिक लांबणीवर पडल्या आहेत. तिसरा आठवडा उलटला तरी अद्याप पावसाने कृपादृष्टी न केल्याने सहलप्रेमींचे वीकेण्ड् कोरडे जात आहेत. यंदाही सहलप्रेमींचे पिकनिक प्लान्स पोस्टपोण्ड होत आहेत. सोशल मीडियापासून कट्ट्याकट्ट्यांवर पिकनिकच्या चर्चा रंगत असल्या, तरी पाऊस आल्यावर पिकनिकच्या तारखा ठरवू, असा सूर तरुणांच्या गटागटांतून ऐकायला मिळत आहे. पावसाळ्यात बहरलेला निसर्ग सहलप्रेमींना खुणावत असतो. त्यामुळे जून महिना सुरू झाला की, सहलप्रेमींच्या पिकनिक प्लान्सला उधाण येते. या दिवसांत सहलप्रेमींना खुणावतात ते धबधबे, ट्रेकिंग पॉइंट, रिसॉर्ट. कैक फुटांच्या उंचीवरून येणारे फेसाळते पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते. भंडारदरा, कोंडेश्वर, वदप, भुशी डॅम, भिवपुरी, पळसदरी, माथेरान, तुंगारेश्वर, राधा फॉल, पांडवकडा, झेनीथ, गाढेश्वर, फणसाड, आषाणे, थिदबीचा धबधबा, तर ट्रेकिंगसाठी गडकिल्ले अशा अनेक ठिकाणांची निवड सुरू होते. रिमझिम बरसलेल्या पावसामुळे ठाणे, मुंबईकरांची सुपरफास्ट ट्रॅकवर असलेली मान्सून पिकनिकची धावपळ तसेच, लोणावळा, खंडाळा, माळशेज घाटासारख्या गजबजलेल्या ठिकाणांबरोबरच जवळपासचे धबधबे शोधण्याची सुरू असलेली धावपळ थंडावली आहे. या आठवड्यात लाँग वीकेण्ड असल्याने लवकरच पाऊस यावा, अशी दृढ इच्छा व्यक्त केली जात आहे. या सर्वच ठिकाणी जाण्यासाठी सहलप्रेमी उत्सुक आहेत. परंतु, वरुणराजा काही बरसत नसल्यामुळे त्यांच्या प्लान्सला कात्री लागली आहे.