शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात नगरसेवकावर शाखाप्रमुखाचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 03:29 IST

शिवसेना नगरसेवक विकास पाटील यांच्यावर पक्षाच्या शाखाप्रमुखासह सात ते आठ जणांनी हल्ला केला.

उल्हासनगर : शिवसेना नगरसेवक विकास पाटील यांच्यावर पक्षाच्या शाखाप्रमुखासह सात ते आठ जणांनी हल्ला केला. हल्ल्यात पाटील जखमी झाले असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकाराने शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.उल्हासनगर कॅम्प नं-५, प्रभाग क्र-२० मधून विकास पाटील व लहान भाऊ आकाश पाटील शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. माजी महापौर अपेक्षा पाटील यांचे विकास पाटील पती असून वडील परशुराम पाटील, अंबरनाथ तालुका शिवसेनेचे उपशहरप्रमुख आहेत. विकास पाटील दोन मित्रांसह कोकालेगाव येथून रविवारी दुपारी ४ वाजता परत येत होते. त्यावेळी गणेश पाटील, जितू साळुंके यांच्यासह सात ते आठ इसमांनी त्यांच्यावर कारण नसताना हल्ला केल्याचे तक्रारीत नमुद केले. हल्ला करणारे शिवसेना शाखाप्रमुख व शिवसैनिक असल्याने शहर शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.विकास पाटील यांच्या गाडीचीही तोडफोड हल्लेखोरांनी करून धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले. शिवाजी पोलीस ठाण्यात गणेश पाटील, जितू साळुंखे याच्यासह सात ते आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गणेश पाटील व जितू साळुंखे याला पोलिसांनी अटक केली.>कुर्ला कॅम्प शिवसेना शाखेचा जितू साळुंखे शाखाप्रमुख असून गणेश पाटील हाही कट्टर शिवसैनिक आहे. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी पाटील यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगून हल्लेखोराबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली.