शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

बॉईज क्रिकेट क्लबची एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघावर मात

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 6, 2024 17:32 IST

बॉईज क्रिकेट क्लबने सहा चेंडूत १२ धावा करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : बॉईज क्रिकेट क्लबने सुपर ओव्हरमध्ये गतउपविजेत्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (अ) संघाला एका धावेने मत देत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित १२ व्या ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. सामन्याच्या निर्धारित डावात उभय संघ १५९ धावांवर बरोबरीत राहिले. सुपर ओव्हरमध्ये एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघाने एका षटकात ११ धावा जमा केल्या. बॉईज क्रिकेट क्लबने सहा चेंडूत १२ धावा करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १५९ धावसंख्या उभारली. संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देताना आदित्य रावतने ८१ आणि हर्षल जाधवने ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. या डावात निपुण पांचाळने दोन, हर्षल सोनी, अथर्व अंकोलेकर आणि शशी कदमने प्रत्येकी एक बळी मिळवला. या धावसंख्येला उत्तर देताना एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघ ५ बाद १०१ असा अडचणीत आला होता. पण विद्याधर कामत आणि शशी कदमने सहाव्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी करत संघाला १५५ धावसंख्येवर पोहचवले, शशीने नाबाद ४६ आणि जसप्रीत रंधावाने ३० आणि विद्या कामतने २२ धावा केल्या. पण या दरम्यान विद्या कामत तंबूत परतल्याने शशीने हर्षल सोनीला हाताशी घेत एक धाव घेऊन सामन्यात बरोबरी साधली. बॉईज क्रिकेट क्लबच्या पियुष कनोजियाने दोन, सक्षम पराशर, पराग जाधव आणि हर्षल जाधवने प्रत्येकी एक बळी मिळवला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना अखिल हेरवाडकरने नाबाद २ आणि शशी कदमने नाबाद ९ धावा करत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबला ११ धावा जमवून दिल्या, उत्तरादाखल हर्षल जाधवने ४ आणि आदित्य रावतने ८ धावा करत बॉईज क्रिकेट क्लबला उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिले.संक्षिप्त धावफलक : बॉईज क्रिकेट क्लब : २० षटकात ९ बाद १५९ (आदित्य रावत ८१, हर्षल जाधव ५१ , निपुण पांचाळ ४-२८-२, हर्षल सोनी ४-३४-१, अथर्व अंकोलेकर ४-२८-१, शशी कदम ४-२३-१ ) बरोबरीत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (अ) : २० षटकात ७ बाद १५९ (शशी कदम नाबाद ४६जसप्रीत रंधावा ३९, विद्याधर कामत २२, पियुष कनोजिया ३-१६-२ , सक्षम पारकर ४-३७-१ पराग जाधव १-१४-१, हर्षल जाधव ४-३७-१)/

सुपर ओव्हर : एलमठ शिंदे क्रिकेट क्लब (अ संघ) : १ षटकात बिनबाद ११ ( अखिल हेरवाडकर नाबाद २ , शशी कदम नाबाद ९, अजय मिश्रा १-०-०-११ ) पराभूत विरुद्ध बॉईज क्रिकेट क्लब : १ षटकांत बिनबाद १२ (हर्षल जाधव नाबाद ४, आदित्य राव नाबाद ८, अथर्व अंकोलेकर १-०-०-१२ )

टॅग्स :thaneठाणे