शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

हजारेंच्या सहमतीनंतर धरणग्रस्तांचा बहिष्कार

By admin | Updated: September 23, 2014 00:10 IST

मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या काळू धरणामुळे सुमारे ४१ गावपाड्यांना जलसमाधी मिळणार आहे.

ठाणे : मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या काळू धरणामुळे सुमारे ४१ गावपाड्यांना जलसमाधी मिळणार आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी एकाही राजकीय पुढाऱ्याने अद्याप या गावकऱ्यांची बाजू मांडली नाही. यामुळे या विधानसभा निवडणुकीवरदेखील बहिष्कार टाकण्याचा निर्णय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच ग्रामस्थांनी घेतल्याचे उघड झाले .मुरबाड तालुक्यातील काळू नदीवर बांधण्यात येणाऱ्या या धरणाचे संपूर्ण पाणी मुंबई महानगरपालिकेला जाणार आहे. परंतु, मागील काही वर्षांपासून सुमारे ४१ गावपाड्यांनी तीव्र विरोध करून या धरणाचे काम थांबवले आहे. लोकसभा निवडणुकीवरदेखील सुमारे १८ हजार लोकसंख्येच्या १९ गावांमधील गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला होता. त्याची पुनरावृत्ती करून या विधानसभा निवडणुकीवरदेखील या गावकऱ्यांनी निर्धार कायम ठेवून बहिष्कार टाकला आहे. या निर्धारापूर्वी या गावांच्या शिष्टमंडळाने राळेगण सिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेऊन बहिष्कार टाकत असल्याचे त्यांना सांगितले आहे़अण्णांना भेटलेल्या शिष्टमंडळात काळू धरणविरोधी शेतकरी, कष्टकरी व भूमिहीन समुदाय मंचचे कृष्णकांत तेलम, पोपटराव देशमुख, भगवान भला, आत्माराम देशमुख, सदाशिव देशमुख, अशोक पठारे, सुरेश देशमुख, दशरथ देशमुख, प्रवीण देशमुख, रमेश राऊत आदी गावकऱ्यांचा समावेश होता.या वेळी त्यांनी काळू धरण बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना जबरदस्तीने धरणाचा घाट घातला जात आहे. याशिवाय, ४१ गावपाड्यांच्या सर्व ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन या धरणाला विरोध दर्शवला आहे. यानंतर, तळेगाव, जडई, फांगळोशी, खुटळ, चासोळे, दिघेफळ, शिवेचीवाडी, खरशेत, उंबरोली, कुंदाचीवाडी, लाहाडी, भिकारवाडी, शिरसोनवाडी, भट्टीची वाडी, पायरवाडी, वाकळवाडी, न्याहाडी आदी गावांच्या गावकऱ्यांनी तळेगाव येथे एकत्र येऊन बैठक घेतली आणि मतदानावर बहिष्कार टाकला.