शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाने अंबरनाथमध्ये एका प्रभागाची हद्द बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 01:07 IST

मतदाराने घेतली होती हरकत

अंबरनाथ : राज्य निवडणूक आयोगाने अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रभागरचनेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एका प्रभागाच्या रचनेत चुकीच्या पद्धतीने बदल करण्यात आला होता. त्या बदलाबाबत एका मतदाराने हरकत घेतली होती. त्या हरकतीवर सुनावणीही घेण्यात आली होती. अखेर, निवडणूक आयोगाने या हरकतीबाबत निर्णय देत पालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ मधील प्रभागरचनेवर घेतलेली हरकत मान्य केली आहे.अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात होणे अपेक्षित होते. मार्च महिन्यात प्रभागरचना निश्चित करण्यात आली होती. मात्र, प्रभागरचनेमध्ये प्रभाग क्रमांक-२२ मध्ये काही भाग वगळण्यात आल्याने त्यासंदर्भात स्थानिक रहिवासी आणि इच्छुक उमेदवार किरण राठोड यांनी निवडणूक आयोगाकडे हरकत नोंदविली होती. त्याचदरम्यान लॉकडाऊन लागल्याने निवडणूक आणि निवडणुकीची प्रक्रिया लांबणीवर पडली. एप्रिल महिन्यात निवडणूक न झाल्याने आता ती निवडणूक नेमकी कधी घेणार, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. मात्र, आॅक्टोबर महिन्यात निवडणूक आयोगाने अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रभागरचनेतील एका प्रभागाच्या हरकतीवर निर्णय दिला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक २२ मध्ये काही प्रमाणात बदल होणार आहेत.या प्रभागात बदल झाल्याने त्याचा परिणाम परिसरातील इतर प्रभागांच्या रचनेवरही निश्चित पडणार आहे.प्रभागांच्या सीमेत होणार बदलप्रभाग २२ हा हाउसिंग बोर्ड परिसरातील असून त्यातील काही चाळी या नकाशात त्याच प्रभागात दाखविण्यात आल्या होत्या. मात्र, रचनेमध्ये तो भाग शेजारील शिवनगर या प्रभागात टाकला होता.तसेच शास्त्रीनगर भागातील काही भागही प्रभाग क्रमांक २२ ला जोडण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील दोन ते तीन प्रभागांच्या सीमेमध्ये बदल होणार आहे.नकाशावर दाखविण्यात आलेला परिसर प्रभागरचनेला धरून होता. मात्र, प्रत्यक्षात ब्लॉक दुसऱ्या प्रभागाला जोडण्यात आला होता. त्यामुळे मी ती हरकत घेतली होती. त्या हरकतीवर मी माझे म्हणणेही मांडले होते. त्याच्यावर सकारात्मक निर्णय झाल्याचे समाधान आहे.- किरण राठोड, रहिवासी