शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

सोनसाखळी चोरणारे दोघे अटकेत

By admin | Updated: April 26, 2017 00:19 IST

ठाणे जिल्ह्यातील टॉप २० सोनसाखळी चोरट्यांच्या यादीतील दोन चोरट्यांना कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी एकाचे

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील टॉप २० सोनसाखळी चोरट्यांच्या यादीतील दोन चोरट्यांना कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी एकाचे नाव मम्मू उर्फ वसिस संजय इराणी (२२) आहे. तर दुसरा आरोपी अल्पवयीन आहे. ते दोघेही आंबिवलीतील इराणी वस्तीमध्ये राहणारे आहेत. चोरीच्या १७ मोटरसायकल व १० किमती मोबाइल त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत, अशी माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली. पार्किंगमधील मोटरसायकली ते चोरत असत. त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा मोबाइल चोरीकडे वळवला होता. धावत्या रेल्वे गाडीत दरवाज्याजवळ मोबाइलवर बोलणाऱ्या प्रवाशांना हेरून ते त्यांच्या हतावर फटका मारत असत. मोबाइल खाली पडल्यानंतर तो ते चोरत असत. सोनसाखळी चोरण्यासाठी ते चोरीच्या मोटरसायकल वापरत असत. आरोपींकडून हस्तगत केलेल्या १७ मोटरसायकलची किंमत आठ लाख ८५ तर १० मोबाइलची किंमत एक लाख रुपये आहे. त्यांच्या अटकेमुळे मोटरसायकल चोरीचे १६ गुन्हे उघडकीस आले आहेत. अल्पवयीन आरोपीची रवानगी भिवंडीतील बालसुधारगृहात करण्यात येणार आहे. उल्हासनगरचे पोलीस पथक काही दिवसांपूर्वी आंबिवलीतील इराणी वस्तीत सोनसाखळी चोर पकडण्यासाठी गेले असताना तेथील महिलांनी त्यांच्यावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. अल्पवयीन आरोपीचा या गुन्ह्यातही सहभाग आहे, असे शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)