शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

दोघांच्या भांडणात प्रश्नांना ठेंगा

By admin | Updated: February 20, 2017 06:10 IST

ठाणे आणि उल्हासनगरमधील प्रचाराच्या तोफा रविवारी संध्याकाळी थंडावल्या असल्या, तरी सत्तेतील शिवसेना, भाजपाची भांडणे, परस्परांना दिलेल्या उपमा

अजित मांडके/पंकज पाटील /ठाणे /उल्हासनगरठाणे आणि उल्हासनगरमधील प्रचाराच्या तोफा रविवारी संध्याकाळी थंडावल्या असल्या, तरी सत्तेतील शिवसेना, भाजपाची भांडणे, परस्परांना दिलेल्या उपमा, उखाळ्यापाखाळ्यांभोवतीच सर्व तो फिरत राहिला. जाहीरनामे वगळता अन्यत्र विकासाच्या प्रश्नांची चर्चा झाली नाही. मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसने तो मुद्दा काहीसा चर्चेत आणला, पण काँग्रेससह अन्य सर्व पक्ष नागरी प्रश्न चर्चेत आणण्यात कमी पडले आणि त्यामुळेच भांडाभांडीत स्थानिक प्रश्नांना वाकुल्या दाखवत प्रचाराची सांगता झाली. सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात, विकासनाम्यात, वचक आणि वचननाम्यात पालिकेने आजवर केलेली कामे-आखलेले प्रकल्प यावर भर देण्यात आला आणि त्यातही त्याचत्याच मुद्यांची जंत्री मांडण्यात आली. ठाणे आणि उल्हासनगर पालिकांत पुरेशा तंत्रशुद्ध यंत्रणेचा वापर न झाल्याने उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्यांचे शिक्षण, संपत्तीची माहितीही खूप उशिरा मतदारांपुढे आली. त्यामुळे रिंगणातील उमेदवारांच्या दर्जाबाबत फारशी चिकित्सा झाली नाही.ठाण्याच्या प्रचारात यंदा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना आलेल्या धमकीचे प्रकरण गाजले. सुरूवातीला मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा मांडला. नंतर त्याभोवती आरोप-प्रत्यारोपांची राळ उडत राहिली. शिवसेनेने करून दाखवले, भोवती प्रचार फिरवत ठेवला, तर सत्तेत सहभागी असूनही भाजपाने पालिकेच्या कारभारातील उणिवांवर बोट ठेवले. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यांनीही शिवसेनेलाच टीकेचे लक्ष्य बनवले. हे प्रमुख पक्ष वगळता रिंगणातील अन्य पक्षांनी प्रचारातही फारशी चमकदार कामगिरी दाखवली नाही. प्रभागांची संख्या वाढल्याने यंदा दिवा परिसराला प्रथमच प्रचारात अनन्यसाधारण महत्त्व आले.'फिकी रणधुमाळीच्बहुरंगी लढती, निवडणूक आयोगाने खर्चावर ठेवलेले नियंत्रण, चार प्रभागांचा एक प्रभाग झाल्याने मतदारसंघाचा वाढलेला विस्तार यांचा परिणाम यंदाच्या प्रचारावर झाला. च्शहरात प्रचाराचे फारसे वातावरण जाणवले नाही. शेवटच्या टप्प्यात उन्हामुळे प्रचाराचे पाणीपाणी झाले. एकंदरीतच ठाण्यात प्रचाराची रणधुमाळी झाली, पण ती रंगली नाही.गुन्हेगारीभोवती उल्हासनगरचा प्रचार १उल्हासनगरमध्ये सर्व पक्षांनी प्रचारात विकासाचे मुद्दे बाजूला सारत एकमेकांची उणीदुणी काढण्यावर समाधान मानले. टीम ओमी कलानी आणि गुन्हेगारी यांच्याभोवतीच प्रचार रंगला. भाजपा आणि गुन्हेगारांचे संबंध समोर आणत मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न शिवसेना, साई पक्ष, काँगे्रस आणि राष्ट्रवादीने केला. २उल्हासनगरमध्ये भाजपाला ओमी कलानी यांच्या टीमची संगत लाभल्याने तोच मुद्दा सर्व पक्षांनी अजेंड्यावर ठेवला. स्थानिक प्रभागांतील विकासाचे मुद्दे घेऊन प्रत्येक उमेदवाराने प्रचार केला असला, तरी पक्षाच्या वतीने आलेल्या जिल्ह्यातील नेत्यांनी मात्र विकासाच्या मुद्द्याला बगल देत भाजपावर आरोप करण्यात धन्यता मानली. भाजपाने शिवसेनेच्या सत्तेला लक्ष्य केले, तर शिवसेनेने भाजपाच्या गुंडप्रवृत्तीला. साई पक्षाचा प्रचार हा केवळ प्रभागापुरता मर्यादित राहिला. उल्हासनगरकडे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पाठ फिरवली. ३राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठीही प्रदेशचा एकही नेता फिरकला नाही. एवढेच नव्हे, तर राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदार केवळ बॅनरपुरत्या मर्यादित राहिल्या. उल्हासनगरमध्ये जाहीर सभेसाठी कार्यकर्ते जमवणे अवघड काम असल्याने सर्वच पक्षांनी प्रचार फेरीवरच भर दिला. ४उल्हासनगरमधील पाणीसमस्या, अर्थवट अवस्थेतील काँक्रिटीकरण, धोकादायक इमारतींचा प्रश्न, मुस्लिमांसाठी असलेली दफनभूमी, घरपट्टीचा प्रश्न यावर निवडणुकीचा मूळ प्रचार अवलंबून असतानादेखील प्रत्येक पक्षाने केवळ एकमेकांविरोधात आरोप करण्यातच वेळ घालवला. प्रमुख नेते फिरले शहरभरच्ठाण्यात शिवसेनेने मोठ्या सभा घेण्याऐवजी चौक सभा, विभागीय मेळाव्यांवर भर दिला. शिवसेनेचे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नेते एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि सुभाष भोईर, गोपाळ लांडगे यांनी परिसर पिंजून काढला. राष्ट्रवादीमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. त्यांचे अन्य नेते म्हणजेच गणेश नाईक आणि वसंत डावखरे काहीसे पिछाडीवर होते.च्काँग्रेसमध्ये नारायण राणे यांनीच जान आणली. प्रदेश सचिव बाळकृष्ण पूर्णेकर यांनी काही भागांवर लक्ष केंद्रित केले. शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी केवळ आपल्या वॉर्डावरच लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले. मनसेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी खोलात गेलेल्या मनसेला या निवडणुकीत काही अंशी का होईना बाहेर काढून सत्ताधारी शिवसेनेबरोबर लढा देण्यासाठी ऊर्जा देण्याचे काम केल्याचे दिसून आले. दिव्याला अनन्यसाधारण महत्त्वच्नगरसेवकांची संख्या दोनवरून ११ वर गेल्याने यंदाच्या निवडणुकीत प्रथमच दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व आले. राष्ट्रवादी वगळता सर्वच पक्षांनी दिव्याकडे कूच केले. याची सुरुवात मनसेने डम्प्ािंगच्या आंदोलनाच्या माध्यमातून केली. नंतर, दिवा महोत्सव आणि राज ठाकरे यांची सभा घेऊन सर्वांचेच लक्ष या भागाकडे वळवले. च्राज यांची केवळ एकच सभा झाली, तीही दिव्यात. परिणामी, ठाण्यात त्या पक्षाचे वातावरण तापले नाही. शिवसेनेनेदेखील येथे विभागीय मेळावे घेतले. परंतु, महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सभा घेत या शहराचे महत्त्व अधोरेखित केले. दिवा दत्तक घेण्याची भाषा त्यांनी केली. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांची रॅलीही दिवा-मुंब्रा येथे झाली. घरोघर प्रचारास मुभारविवारी सायंकाळी ५.३० नंतर जाहीर प्रचाराचा कालावधी संपला असला, तरी उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा आहे. मात्र, प्रचारासाठी माइकचा वापर करण्यास आणि समूहाने फिरण्यास मनाई आहे. अशा प्रचारावर आचारसंहिता पथकांमार्फत देखरेख ठेवण्यात येणार आहे. या प्रचारादरम्यान काही आक्षेपार्ह बाबी आढळल्यास संबंधित उमेदवारांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.च्या कारवाईसाठी आचारसंहिता कक्षामार्र्फत १० चेक पोस्ट पथके, तीन भरारी पथके तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर ३४ भरारी पथके, २७ व्हिडीओ सर्व्हेलन्स पथके, पोलीस, आयकर विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ७७ पथकांमार्फत देखरेख ठेवण्यात येणार आहे.युती तुटल्याचे निमित्त झाल्याने ठाण्यात शिवसेना विरुद्ध भाजपा असाच संघर्ष रंगला. सभांमध्येही या दोन्ही पक्षांनी परस्परांवर आगपाखड केली. राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणावर बोट ठेवले. त्यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. परस्परांवर टीका करणारे फलक हेही या वेळच्या प्रचाराचे वैशिष्ट्य ठरले. डम्प्ािंग, मलनि:सारण, पाणी, आरोग्य, टीएमटी, वाहतूककोंडी आदी मुद्दे या निवडणुकीत खासकरून चर्चेत आले. च्शिवसेना आणि भाजपामध्ये रस्ता रुंदीकरण, विकासकामे, पारसिकची चौपाटी अशा विषयांवरून श्रेयाचे राजकारण तापले. काँग्रेस आणि मनसे हे पक्ष या निवडणुकीत काहीसे थंडावल्याचे दिसून आले. शिवसेनेसोबत सत्तेत असल्याने स्थानिक भाजपा नेत्यांकडे फारसे मुद्दे नव्हते. त्यामुळे त्यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या प्रतिमेचा आधार घेतला. त्यामुळे पुढील सभांत जयस्वाल हेही प्रचाराच्या रणधुमाळीच्या केंद्रस्थानी आले. आचारसंहिता भंगाचे १६ गुन्हे दाखल ठाणे : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या पथकाकडून ठाण्यात १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर ३४ भरारी पथके, पोलीस विभाग, आयकर विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांद्वारे उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली.आचारसंहिता पथकाद्वारे रविवारी ५ अनधिकृत पोस्टर्स, १८७ अनधिकृत बॅनर्स, ३ होर्डिंग्ज, २८९५ विविध पक्षांचे झेंडे, ३ मंडप याविरुद्ध कारवाई करण्यात आली. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी ३, विनापरवाना प्रचार कार्यालये उभारल्याबद्दल ८, विनापरवाना मंडप उभारल्याबद्दल १, अवैध रोख रकमेची वाहतूक केल्याप्रकरणी १, अवैध दारू वाहतूकप्रकरणी १, विनापरवाना प्रचाराची मिरवणूक काढल्याबद्दल १ आणि सोशल मीडियावर अपप्रचार केल्याबद्दल १ असे १६ गुन्हे दाखल करण्यात आले.