शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

घरत यांच्यासह दोघांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 05:48 IST

लाचखोरीच्या प्रकरणात अटकेत असलेले कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि लिपिक ललित आमरे व भूषण पाटील यांना मंगळवारी कल्याण न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

कल्याण : लाचखोरीच्या प्रकरणात अटकेत असलेले कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि लिपिक ललित आमरे व भूषण पाटील यांना मंगळवारी कल्याण न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर लगेच तिघांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. पण सरकारी वकिलांनी जामिनावर म्हणणे न मांडल्याने या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे.सात मजली बेकायदा इमारतीवर कारवाई न करण्यासाठी आठ लाखांचा हप्ता स्वीकारताना घरत, आमरे आणि पाटील यांना १३ जूनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. त्यांना दोनदा पोलीस कोठडी मिळाली होती. मंगळवारी पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्या. डी. एस. हातरोटे यांनी तिघांना पोलीस कोठडी न देता २ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर या तिघांनी जामिनासाठी अर्ज केला. मात्र, या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे.घरत चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात केली आहे. घरत यांच्या मोबाइलमध्ये अनेक गोष्टी असून, त्यामुळे मोठा भ्रष्टाचार उघडकीस येऊ शकतो. आणखी काही जणांची नावेही उघडकीस येऊ शकतात, असा संशयही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व्यक्त केला आहे.पैशांची देवाणघेवाण सुरू असताना तक्रारदार आणि घरत यांच्यात झालेले संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रेकॉर्ड केले आहे. पुरावा म्हणून चारही आरोपींच्या आवाजाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवायचे आहेत, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात सांगितले.>घरत यांच्या छातीत कळघरत आणि दोन लिपिकांना पोलीस व्हॅनमधून आधारवाडी कारागृहात नेण्यात येत होते. परंतु, अचानक घरत यांच्या छातीत कळ आली. तर, दोन्ही लिपिकांचा रक्तदाब वाढला. त्यामुळे पोलिसांनी तिघांनाही महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात हलविले आहे.तेथील डॉक्टरांनी तिघांची वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे. त्यांच्यासाठी फिजीशीयनला पाचारण करण्यात येणार आहे. तपासणीनतर त्यांना खरोखरच त्रास झाला आहे की, त्यांनी कारागृहात जाण्यापासून वाचण्यासाठी आजारपणाचा बनाव केला आहे, हे उघड होणार आहे.