शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

...तर भिवंडीतील कामवारी नदी शेतीसाठी ठरेल वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 03:20 IST

शहरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी इतर यंत्रणांवर अवलंबून राहावे लागत आहे.

- पंढरीनाथ कुंभारशहरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी इतर यंत्रणांवर अवलंबून राहावे लागत आहे. सरकारने तुम्ही जलस्रोत निर्माण करा असे सांगितल्यावर भ्रष्टाचाराने डोके वर काढले. यातून ज्यांना आर्थिक फायदा घ्यायचा होता तो घेतला. पण पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्याहूनही नागरिकांची सोय झाली असती, मात्र त्याकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.दिवसेंदिवस वाढणाऱ्या शहरीकरणामुळे प्राथमिक सुविधांवर ताण येत असून त्या देताना यंत्रणांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अर्थात याला अन्य गोष्टीही जबाबदार आहेत. विशेषता पाण्यावरून भविष्यात वाद होऊ शकतात असे भाकित केले जात आहे. त्यामुळे जलस्त्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पण जे आहेत त्याचाही योग्य प्रकारे वापर करून नागरिकांना पाणी कसे देता येईल हेही पाहणे महत्वाचे आहे.भिवंडी तालुक्यातील देपोलीच्या जंगलातून सुरू होणारा कामवारी नदीचा प्रवाह तसेच चावे व करंजावडे गावापासून छोट्या-मोठ्या नदीनाल्यातून वाहणारी कामवारी नदी ग्रामीण भागातून गोडे पाणी घेऊन शहराकडे येते. मात्र या प्रवाहाच्या मार्गावर नदीच्या पात्रातील गाळ न काढल्याने आणि पाणी साठवण्याच्या बंधाºयात वाढ न केल्याने शहराजवळ शेलार धरणावरून हे गोडे पाणी उलटून खाडीपात्रात जाते. त्यामुळे धरणांतून उलटणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी पाटबंधारे व लघुपाटबंधारे विभागाने पुढाकार घेतला पाहिजे.तालुक्यातील खारपट्टीच्या जमिनीवर गोदामांची संख्या वाढत असताना जमिनीचे भाव आकाशाला भिडले आहेत. त्यातच ग्रामीण भागात सरकारकडून होत असलेल्या विविध प्रकल्पात शेतकºयांच्या जमिनी जात असताना या प्रकल्पाजवळच्या जमिनीला मुंबईच्या व्यापाºयांनी लक्ष केले आहे. त्यामुळे शेतजमिनीला भाव आलेला आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणाºया पाण्याच्या साठवणुकीकडे शेतकºयांनी दुर्लक्ष केले आहे. परिणामी हंगामी पिकासह भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणाºया शेतकºयांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील जमिनीच्या व्यवहारात राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतल्याने शेतीला दुय्यम स्थान मिळत आहे.वास्तविक पावसाळ्यात देपोली येथील डोंगरातून येणाºया कामवारी नदीचा प्रवाह मोठा असतो .हा प्रवाह देपोली, साकरोली, नांदिठणे, लामज, म्हापोली,कोयना वसाहत पुढे चावे येथे जातो. तेथून पुढे बंधारे बांधले आहेत. परंतु चावे गावाच्या अगोदर बंधारे बांधल्यास दरम्यानच्या गावात पाण्याचा साठा निर्माण होईल व तेथील शेतकºयांना वर्षभर शेती उत्पादने घेण्यास मदत मिळू शकेल. मात्र हे बंधारे न बांधल्याने कामवारी नदीचे हजारो लिटर पाणी प्रत्येक पावसाळ्यात शेलारमधील धरणांवरून उलटून खाडीपात्रात जाते.देपोली, चावे-भरे आणि करंजावडे या तीन वेगवेगळ्या नदीच्या प्रवाहातून शहराकडे येणारी कामवारी नदी पुंडास, निवळी, रोहिणी, सोनटक्का, कशीवली, विश्वभारती, सैनिक वसाहत, गोरसई, शेलार या गावातून धरणापर्यंत प्रवाहीत होते. या गावा दरम्यान नदीचा छोटा-मोठा प्रवाह असल्याने वहिवाटीसाठी गावाजवळ छोटेमोठे पूल बांधले आहेत. मात्र या पुलाखालून वाहणारे पाणी काही महिन्यातच आटून नदी पात्र ठणठणीत होते.>प्रकल्पासाठी नेमलेली कंपनी बोगसभिवंडी शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी चिंबीपाडा येथे धरण बांधण्याचा प्रकल्प मागील चाळीस वर्षापासून पालिकेच्या कार्यालयात धूळखात आहे. दरम्यान सरकारने महापालिकेला स्वत:चे पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्यास सांगितले असता पालिकेने टेंभीवली-चिंबीपाडा येथील वारणा व कामवारी नदीवर मालकी करण्याच्या निमीत्ताने पाणीपुरवठा विभागामार्फत पीपीपी प्रकल्प राबवण्याचे षडयंत्र काही वर्षापूर्वी रचले. परंतु या प्रकल्पासाठी नेमलेली कंपनी बोगस निघाल्याने पालिकेचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान होऊन या प्रकल्पात झालेल्याभ्रष्ट कारभाराचे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. त्यामुळे या दोन्ही नदीतील पाणीसाठवणे दूरच राहिले परंतु दरवर्षी पावसाचे पाणी खाडीपात्रात जाते हे भिवंडीकरांचे दुर्दैव आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी