शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

लहानग्यांचे पुस्तक हा कौतुकास्पद उपक्रम

By admin | Updated: October 6, 2016 03:02 IST

मराठी साहित्यात बाल-साहित्याची वानवा आहे. तसेच उपलब्ध बाल-साहित्य मोठ्यांनी लिहिले आहे. पण लहानांनी लहानांसाठी प्रथमच साहित्य लिहिल्याचे मी पाहत आहे

डोंबिवली : मराठी साहित्यात बाल-साहित्याची वानवा आहे. तसेच उपलब्ध बाल-साहित्य मोठ्यांनी लिहिले आहे. पण लहानांनी लहानांसाठी प्रथमच साहित्य लिहिल्याचे मी पाहत आहे. त्यांचे पुस्तक ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’तर्फे प्रकाशित करण्यात येणार आहे. हा अतिशय कौतुकस्पद उपक्रम आहे, असे मत नाट्यलेखक व दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांनी व्यक्त केले.‘पै लायब्ररी’ने पाचव्या बाल वाचक महोत्सव घेतला. त्याअगोदर १८ सप्टेंबरला टिळकनगर शाळेत स्वरचित कथांवर स्पर्धा घेतली. त्यात डोंबिवलीतील ४७ शाळांमधून २६४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा हिंदी, मराठी व इंग्रजी भाषांमध्ये झाली. या स्पर्धेसाठी चार गट होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच सर्वेश सभागृहात झाला. त्यावेळी म्हसवेकर बोलत होते. यावेळी संस्थेचे पुंडलिक पै उपस्थित होते. यावेळी म्हसवेकर म्हणाले, की लहानपणापासून मुलांमध्ये वाचनाची आवड रुजवली जात आहे. भविष्यात त्यांना त्याचा फायदाच होईल. पालकांनी मुलांना या उपक्रमासाठी प्रोत्साहित केले, त्यासाठी त्यांचे कौतुक करायला हवे. यावेळी दिलीप गुजर यांची संकल्पना व निर्मित असलेला ‘हसनावळ’ हा कार्यक्रम मुलांसाठी सादर करण्यात आला. (प्रतिनिधी)स्पर्धेचा निकाल : १. गट पहिला : पहिली ते चौथी मराठी माध्यम. प्रथम क्रमांक मधुरा अटकेकर (टिळकनगर विद्यालय), द्वितीय क्रमांक समिका म्हडलेकर (स्वामी विवेकानंद विद्यालय),तृतीय क्रमांक गजेन साठे (स्वामी विवेकानंद विद्यालय),२. गट पहिला : इंग्रजी माध्यम. प्रथम क्रमांक अनुश्री चौहान (स्टे. जोसेफ हायस्कूल),द्वितीय क्रमांक सोयना अरोझ (स्टे. जोसेफ ग्लोबल अकादमी), तृतीय क्र मांक अनुराधा श्रीकेशव (विद्यानिकेतन).३. गट दुसरा : पाचवी ते सातवी मराठी माध्यम. प्रथम क्रमांक चैतन्य दोहेकर (लोकमान्य गुरुकुल स्कूल), द्वितीय क्रमांक दिकशा परब (टिळक नगर विद्यालय), सर्वेश निवेकर (स्वामी विवेकानंद विद्यालय).४. गट दुसरा : इंग्रजी माध्यम : प्रथम क्रमांक अथर्व वैद्य (विद्यानिकेतन), द्वितीय क्रमांक अर्जुन प्रभू (साउथ इंडियन स्कूल), तृतीय क्रमांक आर्यन पै (विद्यानिकेतन) ५. गट दुसरा : हिंदी माध्यम : प्रथम क्रमांक आंचल चौरसिया (वैभव हिंदी स्कूल) द्वितीय क्रमांक यश मिश्रा (जेएसबी मंडळ स्कूल), तृतीय रूपम परिदा (जेएसबी मंडळ स्कूल).६. गट तिसरा : आठवी ते दहावी मराठी माध्यम. वेदिका बुचके (टिळकनगर विद्यालय), द्वितीय क्रमांक नम्रता साखरे (साउथ इंडियन स्कूल), तृतीय क्रमांक शर्वरी बापट (टिळक नगर स्कूल).७. गट तिसरा : इंग्रजी माध्यम. प्रथम क्रमांक संजना बैतुले (ओमकार इंटरनॅशनल स्कूल) द्वितीय क्रमांक विशाखा कोरडे (सिस्टर निवेदिता स्कूल), तृतीय क्रमांक कल्याणी देशपांडे (ग्रीन्स इंग्लीश स्कूल).८. गट तिसरा : हिंदी माध्यम. प्रथम क्रमांक संगीता शेनॉय (मॉडेल इंग्लीश स्कूल)द्वितीय मनिषा चौहान (वैभव विद्यालय)तृतीय क्रमांक अश्विनी चौहान (वैभव विद्यालय).९. गट चौथा : चार अकरावी आणि बारावी मराठी माध्यम. प्रथम क्रमांक विभा वझे (मुलुंड महाविद्यालय), द्वितीय क्रमांक बबिता परदेशी (टिळक नगर महाविद्यालय), तृतीय क्रमांक रेनुका हडपे (टिळकनगर महाविद्यालय) आदींनी पटकाविला.१०. या स्पर्धेचे परीक्षण स्मिता तळेकर, मीना गोडखिंडी, सतीश चाफेकर, सचिन चौगळे आदींनी केले.