शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेचे पुस्तक प्रदर्शन

By सदानंद नाईक | Updated: May 1, 2024 17:50 IST

उल्हासनगर महापालिकेने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘सिंधू भवन’ येथे ‘चला पुस्तकांशी दोस्ती करू या’ या संकल्पनेवर आधारीत पुस्तक प्रदर्शनाचे करण्यात आले

उल्हासनगर : आयुष्य घडविण्यासाठी पुस्तकांशी दोस्ती करा. असे प्रतिपादन आयुक्त अजीज शेख यांनी महापालिकेने आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शन कार्यक्रमात केले. यावेळी यूपीएससी परीक्षा पास होऊन आयएएस झालेल्या अभिषेक टाले यांचा सत्कार करण्यात आला. 

उल्हासनगर महापालिकेने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘सिंधू भवन’ येथे ‘चला पुस्तकांशी दोस्ती करू या’ या संकल्पनेवर आधारीत पुस्तक प्रदर्शनाचे करण्यात आले. प्रदर्शन १ ते ३ मे २०२४ रोजी असे तीन दिवस सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत चालू राहणार आहे. पुस्तक प्रदर्शनाच्या सोहळ्यावेळी आयुक्त अजीज शेख यांनी आयुष्य घडविण्यासाठी पुस्तकांशी दोस्ती करण्याचा सल्ला उपस्थित विध्यार्थांना दिला. कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त किशोर गवस, सुभाष जाधव व सदामंगल पब्लिकेशनचे प्रकाशक संदीप चव्हाण उपस्थित होते. मतदारांमध्ये मतदान जनजागृती व्हावी, यासाठी महापालिकेने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले. पुस्तक खरेदीवर विद्यार्थ्यांना २० टक्के तर ओळखपत्र असणाऱ्यांना ३० टक्के सवलत दिल्याची घोषणा महापालिकेने केली.

पुस्तक प्रदर्शन ठिकाणी सिंधी साहित्य अकादमी यांच्यामार्फत सिंधी साहित्याचा स्वतंत्र स्टॉल लावण्यात आलेला आहे. अनेक सिंधी पुस्तके याठिकाणी उपलब्ध आहेत. महापालिकेच्या शाळा व सिंधी शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महापालिका जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांनी तर आभारप्रदर्शन उपायुक्त सुभाष जाधव यांनी केले. सदर पुस्तक प्रदर्शनात सुमारे ५० हजार विविध प्रकारची पुस्तके असून शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी. असे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी केले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर