शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा पुढे ठेवा एक वही अन् पेन!; ठाण्याच्या झेप प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 16:08 IST

गणेशोत्सवाला सामाजिक जोड देऊन दरवर्षी अनोखा उत्सव झेप प्रतिष्ठान साजरा करीत असते. बाप्पा पुढे ठेवा एक व्ही अन पेन असे आवाहन यंदाही झेप प्रतिष्ठानने केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गणेशोत्सवाला सामाजिक जोड देऊन दरवर्षी अनोखा उत्सव झेप प्रतिष्ठान साजरा करीत असते. बाप्पा पुढे ठेवा एक व्ही अन पेन असे आवाहन यंदाही झेप प्रतिष्ठानने केले आहे. मात्र यंदा केवळ आदिवासी पाड्यातील आणि शहरातील गरजू विद्यार्थी नव्हे तर पूरग्रस्त विद्यार्थ्यांना देखील उत्सवादरम्यान संकलित झालेली शैक्षणिक मदत दिली जाणार आहे. पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करीत झेप प्रतिष्ठानने यंदा देखील हा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी पूर्वतयारी म्हणून संस्थेचे पदाधिकारी ज्या भागांत शैक्षणिक मदतीची गरज आहे अशा ठिकाणांचे सर्व्हेक्षण करत आहे. जेणेकरून ही मदत योग्य विद्यार्थ्यांच्या हातात जावी यामागचा हा हेतू आहे.

झेप प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवात एक वही एक पेन उपक्रम राबवण्यात येणार असून हे या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये झेप प्रतिष्ठानच्या सदस्यांनी व बाप्पाच्या भाविकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला होता. त्याचमुळे जवळपास एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत झाली होती आणि ही मदत आदिवासी पाड्यातील मुलांना पोहचवण्यात आलेली होती.

गणेशोत्सवात घरगुती तसेच सार्वजनिक मंडळातील गणेशभक्तांना झेप प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी एक वही एक पेन देण्याचे आवाहन करण्यात येते ज्या अंतर्गत भाविक दर्शनाला येताना या वस्तू गणेशाला अर्पण करतात आणि ही मदत झेप प्रतिष्ठानचे सहकारी घरी किंवा मंडळांना भेट देऊन जमा करतात. तसेच ही मदत शैक्षणिक वर्षात मुलांना दिली जाते ज्याचा काटकसरीने वापर करून मुल या वस्तूंचा वापर करतात. विद्येची देवता असलेल्या गणेशाची यापेक्षा सुंदर अशी आराधना होऊच शकत नाही असे मत झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास धनवडे यांनी व्यक्त केले. बाप्पाच्या दर्शनाला येताना प्रसादाबरोबर वही आणि पेन आणण्याचे आवाहन धनवडे यांनी केले आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Mahotsavगणेशोत्सव